अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प मांडणार; अनेक मोठे बदल, थेट तुमच्या खिशावर होणार वार

  • Written By: Published:
अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प मांडणार; अनेक मोठे बदल, थेट तुमच्या खिशावर होणार वार

Rule Changes From Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प (Budget ) उद्या शुक्रवार (1 फेब्रुवारी) सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे. दर महिन्याप्रमाणेच या महिन्यातही 1 तारखेला देशात अनेक बदल होणार आहेत. कोणते बदल होणार आहेत ते जाणून घेऊया.

एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल

एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अपडेट केल्या जातात. तेल कंपन्या सुधारित किमती जाहीर करतात. याचा परिणाम सर्वसामान्यांवर होतो. आता 1 फेब्रुवारीला बजेटच्या दिवशी एलपीजी गॅसच्या किमती वाढतात की कमी होतात हे पाहावं लागेल. जानेवारीमध्ये काही बदल केल्यानंतर 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली होती.

UPI Circle : आता दुसऱ्याच्या बँक खात्यातूनही करता येणार पेमेंट; UPI चे नवे फीचरबाबत जाणून घ्या

1 फेब्रुवारीपासून UPI ​​व्यवहारांमध्ये मोठा बदल होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या नवीन नियमांनुसार, स्पेशल कॅरेक्टर असलेल्या UPI आयडी व्यवहारांना परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय आता ट्रान्झॅक्शन आयडीमध्ये फक्त अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर (अक्षरे आणि संख्या) वापरण्यात येणार आहेत. स्वतंत्र ट्रान्झॅक्शन आयडी जनरेट केल्यास पेमेंट फेल होईल.

मारुती सुझुकीच्या गाड्यांच्या किमतीत वाढ

वाढत्या किमती लक्षात घेता, देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने 1 फेब्रुवारीपासून आपल्या विविध मॉडेल्सच्या किमतीत 32,500 रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ज्या मॉडेल्सच्या किमती बदलणार आहेत त्यामध्ये Alto K10, S-Presso, Celerio, Wagon R, Swift, Dezire, Brezza, Ertiga, Ignis, Baleno, Ciaz, XL6, FrontX, Invicto, Jimny आणि Grand Vitara यांचा समावेश आहे.

बँकिंग नियमांमध्ये बदल

कोटक महिंद्रा बँकेने त्यांच्या काही सेवांमध्ये बदल जाहीर केले आहेत. हे बदल 1 फेब्रुवारी 2025 पासून लागू होतील. यातील मुख्य बदल म्हणजे एटीएम व्यवहारांची मोफत मर्यादा कमी करण्यात येणार आहे आणि इतर बँकिंग सेवांच्या शुल्कात वाढ केली जाणार आहे. या बदलांचा बँक ग्राहकांवर परिणाम होईल.

ATF किमतीत बदल

1 फेब्रुवारीपासून एअर टर्बाइन इंधन (ATF) च्या किमतीत बदल होऊ शकतो. तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला एटीएफच्या किमतीत बदल करतात. यावेळी दर वाढल्यास त्याचा थेट परिणाम विमान प्रवाशांच्या खिशावर होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube