Iran-Amarica War : अमेरिकन नौदलाचा व्यापारी जहाजावर हल्ला, जहाजात 24 भारतीय कर्मचारी, 3 भारतीय बेपत्ता

अमेरिकन नौदलाकडून ओमानजवळ सेट्टेबेलो या व्यापारी जहाजावर हल्ला करण्यात आला असून या जहाजावरील 28 पैकी 24 कर्मचारी भारतीय आहेत.

America

America

Iran-US War : अमेरिकन नौदलाकडून ओमानजवळ सेट्टेबेलो (Iran-US War) या व्यापारी जहाजावर हल्ला करण्यात आला असून या जहाजावरील 28 पैकी 24 कर्मचारी भारतीय आहेत. या हल्ल्यानंतर तीन भारतीय बेपत्ता झाले असल्याची माहिती समोर आलीयं. मागील 24 तासांत भारतीय खलाशी असलेल्या दुसऱ्या जहाजावर अमेरिकेच्या नौदलाकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर भारताकडून ओमानच्या राजदुतांना कठोर शब्दांत समज देण्यात आलीयं.

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि ‘लगान’ला 25 वर्षे पूर्ण: 13 जूनला आमिर खानकडून ग्रँड पार्टी, संपूर्ण कलाकार, तांत्रिक टीम राहणार उपस्थित

याआधी पहिला हल्ला होर्मुझजवळ अमेरिकेने केला होता. यामध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात जहाज पूर्णपणे नष्ट झालं असून सुदैवाने भारतीय जहाजावरील 24 भारतीय खलाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. त्यानंतर अमेरिकेकडून करण्यात आलेला हा दुसरा हल्ला असून या हल्ल्यावेळी 24 भारतीय कर्मचारी या जहाजामध्ये होते. त्यापैकी तीन भारतीय कर्मचारी बेपत्ता असल्याची माहिती समोर आलीयं.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणंचही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. इराकच्या इरबिलमधील एअरबेसवरही इराणकडून जोरदार हल्ला करण्यात आलायं. दोन्ही देशांकडून शस्त्रसंधीतही हल्ले-प्रतिहल्ले सुरुच आहेत. इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धाची घोषणा करण्यात आली असून अमेरिकेकडून इराणवर कठोर हल्ले करणार असल्याची घोषणाच ट्रम्प यांनी केलीयं. ट्रम्प म्हणाले, अनेक महिने झाले आहेत, इराणने समझोता केला पाहिजे इराणने करार केला पाहिजे, अन्यथा कठोर हल्ले करणार असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का! तृणमूल पक्षात फूट पाडलेल्या 19 खासदारांची यादी जाहीर

या युद्धादरम्यान अमेरिकेने इराणवर आज 49 टॉमहॉक क्षेपणास्त्रे डागली असल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे इराणकडून होर्मुझची साममुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्यात आलीयं. जहाजे तुमच्या जबाबदारीवर उतरवा, होर्मुझमध्ये आलेलं कोणतंही जहाज उडवू, असा थेट इशाराच इराणच्या जॉइंट मिलिटरी कमिशनची घोषणा केलीयं.

दरम्यान, इराण अमेरिका युद्ध आता आखाती देशांपूर्त मर्यादित राहणार नसून आम्ही अमेरिकेच्या जवानांचा मृतदेहाचा खच पडेल, असा थेट इशाराच इराणी संसदेच्या सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अजीजींनी दिला आहे. त्यामुळे आता पुढील काळात दोन्ही देशांतील युद्ध चांगलंच पेटणार असल्याची शक्यता दिसून येत आहे.

Exit mobile version