Iran-Israel War : अमेरिका-इस्रायल व इराण (Iran-Israel War) युद्ध सुरू होऊन एक महिना झालाय. युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donld Trump) हे इराणच्या नेत्यांशी चर्चा करण्याची भूमिका घेत आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या लष्कराकडून मध्य पूर्वमध्ये भूदलाचे सैन्य उतरविण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त अनेक आंतराष्ट्रीय माध्यमांकडून देण्यात आले आहे.
इराण युद्धाच्या मैदानातून माघार घेत नाही. अमेरिका, इस्रायलला इराण सैन्याकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामुळे मध्य पूर्व भागातील देशांमध्ये अमेरिका लष्कर उतरविणार आहे. त्यामुळे इराणमध्ये प्रत्यक्ष जमिनीवर उतरून युद्ध लढण्याच्या तयारीत अमेरिका आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या नौदलाने साडेतीन हजार सैन्य पाठविलेले आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले की, सुमारे 3,500 अमेरिकी मरीन आणि खलाशी मध्य पूर्वेत दाखल झाले झाले आहेत.
इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मध्य पूर्वमध्ये आपले ताकद लाढविण्यास सुरुवात केली आहे. हे सैन यूएसएस त्रिपोली (USS Tripoli) या जहाजावर तैनात आहे. दोन दिवसांपूर्वी हे सैन्य दाखल झाले आहे. त्रिपोली ही मोठी युद्धनौका आहे. या जहाजावर विमाने आणि इतर लढाईचे साहित्य वाहून नेण्याचे क्षमता आहे.
🎯STRUCK: A central site, 1 of only 2 of its kind in Iran, used to produce critical components for ballistic missiles.
Additionally, dozens of weapon production sites were struck, including those for ballistic missile engines, UAVs & air defence systems. pic.twitter.com/JtGbDV5n90
— Israel Defense Forces (@IDF) March 29, 2026
दहा हजार सैन इराणच्या कुठल्या भागात उतरविणार ?
आता वृत्तसंस्था आयएएनएसने एक वृत्त दिले आहे. सागरी, आकाशातून हल्ले सुरू आहेत. त्यात आता या भागात भूलष्करी दल उतरविण्याच्या तयारीत अमेरिका आहे. या प्रदेशात दहा हजार सैनिक पाठविले जाणार आहे. या संभाव्य तैनातीमध्ये पायदळ तुकड्या आणि चिलखती वाहनांचा समावेश असू शकतो. आयएएनएसच्या वृत्तानुसार हे सैन्य नेमकी कुठे उतरणार आहे हे निश्चित नाही. पण हे सैन्य इराणच्या तेल निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या खारग बेटासह, इराणच्या प्रमुख ठिकाणांच्या कार्यक्षेत्रात तैनात केले जाऊ शकते.
इराणमधील भू-कारवाईसाठी पेंटागॉनची तयारी
पेंटागॉन इराणमध्ये अनेक आठवड्यांच्या भू-कारवाईची तयारी करतंय. कारण हजारो अमेरिकी सैनिक आणि मरीन मध्य-पूर्वेत दाखल होत होत आहे. जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध लढण्याचा निर्णय घेतला तर हा युद्धाचा नवा टप्पा असणार आहे, असे वृत्त ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने आयएएनएसच्या हवाल्याने दिलंय.
इस्रायलचा इराणच्या क्षेपणास्त्र केंद्रावर हल्ला
इस्रायलने रविवारी इराणवर एक मोठा हल्ला केला आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करणाऱ्या केंद्रावर हल्ला केलाय. इराणमधील दोन ठिकाणांपैकी एक असलेल्या एका मध्यवर्ती स्थळावर हल्ला झालाय. याव्यतिरिक्त, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची इंजिने, यूएव्ही (UAVs) आणि हवाई संरक्षण प्रणाली यांच्या उत्पादन स्थळांसह हवाई हल्ले झाले आहेत.
