Iran Israel War : इराणवर पुन्हा हल्ला करणार अमेरिका ? डोनाल्ड ट्रम्पने आखले तीन प्लॉन

Iran- Israel War- डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धडा शिकविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. गुरुवारी लष्करी अधिकारी आणि ट्रम्प यांची बैठक झाली.

Iran Isral War Donld Trump

Iran Isral War Donld Trump

Iran Israel War : अमेरिका-इस्राइल व इराण युद्ध (Iran Israel War) सध्या थांबलेले आहे. तिन्ही देशांमध्ये सीजफायर झालेले आहे. पण जगाला इंधन पुरविणारी हार्मुज सामुद्रधुनी मार्ग अद्याप इराणने खुला केलेला नाही. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे इराणवर चिडलेले आहे. त्यांनी अनेकदा इराणला इशारा दिलेला आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धडा शिकविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. गुरुवारी अमेरिकेचे सेंट्रल कमांड सेंटकॉमचे कमांडर ब्रॅड कूपर आणि जाईंट चिफ चेअरमन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन त्यांना ब्रिफिंग केले आहे. या बैठकीत इराणला धडा शिकविण्यासाठी अमेरिकेने तीन प्लॉन आखले आहे. तसे वृत्त अनेक माध्यमांनी प्रसिद्ध केलेले आहे. तब्बल 45 मिनिटे हे बैठक झाली आहे.

मराठी माणसाला हुतात्मा स्मारकाचा विसर पडावा अशी इच्छा आहे का? महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंचा सरकारला परखड सवाल

अमेरिकेने इस्रायलमध्ये 6 हजार 500 टन दारुगोळा व इतर साहित्य पाठविले आहे. यावरून डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध संपविण्यासाठी ते वाढविण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. मिडल इस्टमध्ये अमेरिकेचे सैन्य कारवाई यूएस सेंट्रल कमांड हाताळत असून, इराणमधील बंदरांची नाकेबंदी अमेरिकेच्या सैन्याने केलेली आहे.

मिसिंग लिंकचं लोकार्पण! फडणवीसांकडून एक्सप्रेस वेवरील प्रवाशांची माफी अन् व्हिडीओ शेअर करणाऱ्या सुळेंना टोला

साडेसहा टन दारुगोळा कशासाठी ?
अमेरिकेने साडेसहा हजार टन दारूगोळा इस्रायलमध्ये पाठविल्याचा दावा द इस्रायल टाइम्स आणि द जेरुसलम पोस्टने केला आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेने दोन मालवाहक जहाज आणि काही विमाने इस्रायलमध्ये पाठविले आहे. त्यात 6 हजार 500 किलो दारुगोळा आहे. त्याचबरोबर सैन्य ट्रक, जॉइंट लाइट टॅक्टिकल व्हीकल्स आणि इतर साहित्य आहे. अमेरिकेने आतापर्यंत इराण-इस्रायल युद्धासाठी इग्रायलमध्ये 1 लाख 15 हजार 600 टन युद्ध सामग्री पाठवलेली आहे.

सेंटकॉमची योजना का ?
Axios च्या एका रिपोर्टनुसार CENTCOM ने इराणविरुद्ध सैन्य कारवाईसाठी नवी योजना तयार केलीय. या योजनेत इराणवर एक मोठा हल्ला करण्याची तयारी आहे. त्यानंतर इराणचे नुकसान होईल आणि तो देश माघार घेईल, अशी रणनिती सेंटकॉमची (CENTCOM) असल्याचे वृत्त आहे. तसे केल्यास तेहरानवर दबाव निर्माण होईल. अमेरिकेचे कारवाई सुरू झाल्यानंतर इस्लामिक स्टेट हे शांततेसाठी पुढे येतील, असा कयास अमेरिका लावत आहे.

होर्मुज सामुद्रीधुनीवर अमेरिका ताबा मिळविणार?
सेंटकॉमची (CENTCOM) आणखी एक योजना बाहेर आलीय. त्या योजनेनुसार इराणने ब्लॉक केलेली होर्मज सामुद्रीधुनीचा एक हिस्सा अमेरिका ताब्यात घेऊ शकते. त्यानंतर व्यावसायिक जहाजांसाठी मार्ग खुला होईल. त्यासाठी जमिनीवर जावून अमेरिका ऑपरेशन राबवू शकते.

Exit mobile version