Download App

बळाचा वापर केल्याने युनोचा इस्त्रायलला इशारा तर अमेरिकेकडून इराणवरही कारवाईची मागणी

Iran Israel War UNO warn for Israel Revenge : 1 एप्रिलला इस्रायलने ( Israel) ड्रोन हल्ला केल्यानंतर इराणकडूनही ( Iran ) इस्रायलवर मोठा हल्ला करण्यात आला आहे. इराणकडून याला दूतावासावरील हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हटले आहे. तर दुसरीकडे आता इस्रायल देखील या हल्ल्यावर इराणला प्रत्युत्तर देणार असल्याची शक्यता आहे. त्यावर आता संयुक्त राष्ट्रांनी ( UNO ) बळाचा वापर केल्याने इस्त्रायलला कारवाईचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने देखील संयुक्त राष्ट्राकडे इराणवर देखील कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज्यावर अवकाळीचं संकट कायम; आजही काही जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट!

संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या एका बैठकीमध्ये बोलताना संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एनटेनिओ गुटेरेस यांनी सदस्य देशांना सांगितलं की, संयुक्त राष्ट्र संघ कोणत्याही राज्याच्या अखंडतेविरुद्ध तसेच राजकीय स्वातंत्र्यविरुद्ध शक्ती वापरण्यास प्रतिबंध करते. त्यामुळे इस्रायलकडून इराणवर करण्यात आलेल्या तसेच इराणच्या इस्रायलवरील हल्ल्याचा देखील त्यांनी निषेध केला.

Horoscope Today: आज ‘कन्या’ राशीला मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता

दरम्यान शनिवारी इराणने इस्रायलवर 200 हून अधिक ड्रोन आणि मिसाईल हल्ले केल्यानंतर अमेरिका, ब्रिटन यासह अनेक देशांनी यांचा निषेध केला होता. अमेरिकेने इस्रायलच्या सुरक्षेची मागणी केली होती. त्यावर गुटेरस म्हटले की, सध्या मध्ये पूर्व युद्धाच्या छायेत आहे. तेथील लोक संघर्षाचा सामना करत आहे. त्यामुळे हा तणाव कमी करण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे अमेरिकन राजदूत रॉबर्ट वूड यांनी इस्रायलसोबत इराणवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

इराण – इस्रायलमध्ये युद्ध पेटलं तर कोणाकडे किती लष्करी ‘पावर’ ?

इस्रायल आणि हमास युद्धानंतर (Hamas and Israel War) इस्रायल आणि इराण युद्धाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध झाला तर कोणता देश विजय मिळवेल? कोणत्या देशाकडे जास्त लष्करी पावर (Military Power) आहे? या प्रश्नांचा उत्तर जाणून घ्या.

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायल संरक्षण बजेटच्या बाबतीत इराणच्या पुढे आहे तर सैनिकांच्या संख्येच्या बाबतीत इराण इस्रायलपेक्षा खूप पुढे आहे. द सनने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलचे संरक्षण बजेट 24.2 अब्ज डॉलर आहे तर इराणचे संरक्षण बजेट 9.9 अब्ज डॉलर आहे. या अहवालानुसार, इस्रायलकडे 612 तर इराणकडे 551 विमाने आहेत. मात्र रणगाड्यांचा विचार करता इराणची ताकद इस्रायलच्या जवळपास दुप्पट आहे. इस्रायलकडे 2200 तर इराणकडे 4071 रणगाडे आहेत.

follow us