Iran Threat to America and Israel for counterattack after attack : गेल्या काही महिन्यांपुर्वी इराणवर एकीकडे इस्त्राइल आणि दुसरीकडे अमेरिका या दोन्ही राष्ट्रांनी हल्ले केले होते. त्यांना इराणने कडवे प्रत्युत्तर दिले होते. मात्र आता इराणने इस्त्राइल आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांना थेट धमकी दिली आहे. हल्ले केल्यास त्याचे तसेच प्रत्युत्तर दिले जाईल असं इराणने म्हटलं आहे.
इराणमध्ये रविवारी इराण-इराक युद्धाचा वर्धापन दिन साजरा केला. यावेळी इराणचे इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड कॉर्प यांनी इस्त्रायल आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांना थेट धमकी दिली. या देशांनी इराणवर हल्ला केल्यास त्याला तसेच प्राणघातक प्रत्युत्तर दिले जाईल. असं इराणने म्हटलं आहे. त्यासाठी इराण युद्धभूमीवर उतरेल. असं देखील त्यांनी म्हटलं.
अतिवृष्टीने पिकांचं नुकसान, तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या; पिकपाहणी करत तनपुरेंची मागणी
गेल्या काही दिवसांपूर्वी इराण आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या 12 दिवसांचं युद्ध तसेच पुर्वीचे काही संघर्ष या पार्श्वभूमीवर इराणकडून ही भूमिका घेतली आहे. न्यूज वीक या वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. त्यांच्यावृत्तानुसार इराणने थेट भूमिका घेतली आहे की, शत्रुने कोणतीही कारवाई किंवा चूक केल्यास इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण थेट युद्धभूमीवर उतरेल. इराणवरील हल्ल्यांचे आणखी प्राणघातक उत्तर देईल.
मंत्रिपद गमावलेल्या धनुभाऊंना काम मिळणार; आर्त विनवणीवर दादा पॉझिटिव्ह
दरम्यान या अगोदर शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हटले होते की, मी इराणच्या युरेनियमचा नाश करून त्यांची अणुउर्जेची आशा नष्ट केली. ते प्रत्येक बॉम्ब लक्ष्यावर पोहचले. हे आश्चर्यकारक होतं ते खरंच नायक ठरले. त्यानंतर लगेगचच इराणने इस्त्रायल आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांना थेट धमकी दिली आहे.