Download App

Israel Hamas War : गाझामध्ये 5 दिवस पुरेल एवढंच अन्न; उपासमारीतही हमास-इस्त्रायल युद्ध सुरूच

Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे. त्यामुळे गाझामध्ये उपासमारीचं संकट निर्माण झालं आहे. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रम या विभागाने सांगितलं.

World Cup 2023 : पुन्हा मोठा उलटफेर; ऑरेंज आर्मीकडून बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा !

यावर गाझातील अधिकाऱ्यांचं म्हणण आहे की, इस्त्रायलच्या बॉम्बहल्ल्यात आता पर्यंत 2800 हून अधिक लोक मारले गेले आहेत. त्यात एक चतुर्थांश लहान मुलं आहेत. तर जखमींची संख्या 11000 च्यावर गेली आहे. त्यात रूग्णालयांची परिस्थिती भीषण असताना आता दुकानांमध्ये पुढील चार दिवसांपुरतचं अन्न शिल्लक राहिले आहे. त्या संदर्भात तेथील अधिकाऱ्यांनी संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रम या विभागाला सांगितलं आहे.

Boys 4 : ‘ये ना राणी’वर थिरकणार महाराष्ट्र; बॅाईज 4 मधील आणखी एक गाणं रिलीज…

ब्रेड मिळवण्यासाठी देखील लोकांना तासन् तास रांगेत उभं राहावं लागत आहे. तर 23 पैकी केवळ 5 बेकरी सुरू आहेत. तर संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रम या विभागाकडे असणारे अन्न देखील अत्यंत कमी आहे. त्यात केवळ एक मिस्त्र येथील अरिश विमानतळ हे एकच विमानतळ आहे. ज्यावर इस्त्रायलने ताबा मिळवलेला नाही. मात्र येथून गाझातील नागरिकांना अन्नाची मदत मिळू शकत नाही. कारण हे विमानतळ केवळ परदेशी नागरिकांच्या मदतीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र येथून गाझातील नागरिकांना अन्नाची मदत मिळाल्यास इस्त्रायल हे विमानतळ देखील ताब्यात घेईल. अशी भीती आहे. मात्र येथे देखील लोकांनी मदतीसाठी रांगा लावल्या आहेत.

दरम्यान संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रम या विभागाने या भागात आतापर्यंत तब्बल 300 मेट्रीक टन अन्न पुरवठा केला् आहे. जो पुढील एक आठवडा 250000 लोकांना पुरणार आहे. तसेच संयुक्त राष्ट्राचे मानवतावादाचे प्रमुख मार्टिन ग्रिफथ्स लवकरात लवकर गाझामध्ये आणखी मदत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे एकीकडे गाझापट्टी तील लोक उपासमारीने मरत आहेत मात्र हमास इस्त्रायलला नष्ट करण्यासाठी युद्धात उतरलं आहे. त्यामुळे यामध्ये केवळ मानवतेची हत्या होतं आहे.

Tags

follow us