Download App

Israel Hamas War : भारताने दिला पॅलेस्टाइनला मदतीचा हात, औषधांसह जीवनावश्यक वस्तू केल्या रवाना

Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. त्यामुळे आता जगभरातील देश पॅलेस्टाइनला मदत करत असताना भारताने देखील पॅलेस्टाइनला मदतीचा हात दिला आहे.

भारताने दिला पॅलेस्टाइनला मदतीचा हात…

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सामान्य गाझा आणि पॅलेस्टीनी नागरिकांना मात्र होरपळून काढत आहे. त्या पार्श्वभूमीवर या नागरिकांना माणुसकीचा आधार देणे गरजेचे असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवता वादी संघटनेने पुढाकार घेत पॅलेस्टाइनला मदत केली. त्यानंतर जगभरातील देश पॅलेस्टाइनला मदत करत असताना भारताने देखील पॅलेस्टाइनला मदतीचा हात दिला आहे. भारताने यासाठी भारतीय हवाई दलाचे सी-17 हे विमान खास रवाना केले आहे.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले वाघ बकरी ग्रुपचे संचालक पराग देसाई कालवश

Tags

follow us