Download App

इस्त्रायलचा लेबनॉनवर एअर स्ट्राईक! बेरुतमधील हवाई हल्ल्यात 18 ठार; इमारती कोसळल्या

लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात एका इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.

Israel Lebanon War : लेबनॉन विरोधात इस्त्रायलने पुन्हा जोरदार (Israel Lebanon War) हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. हमास आणि हिजबुल्लाच्या म्होरक्यांना ठार केल्यानंतर आणखी कठोर कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. बेरुत शहरात दोन (Israel Attack) वेगवेगळ्या ठिकाणी इस्त्रायलने हवाई हल्ले केले. या हल्ल्यांत कमीत कमी 18 लोकांचा मृत्यू झाला. तर 92 लोक जखमी झाले आहेत. लेबनॉनच्या आरोग्य (Israel Lebanon Conflict) मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात एका इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर आणखी एक इमारत पूर्ण ध्वस्त झाली आहे.

या हल्ल्यांवर इस्त्रायली सैन्याने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. हिजबुल्लाचा नायनाट करण्यासाठी इस्त्रायलने कठोर कारवाईस सुरुवात केल्यानतंर हा हल्ला झाला आहे. हवाई हल्लेच नाही तर जमिनीवरील हल्ल्यांतही वाढ झाली आहे. याआधी पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले होते की विस्थापित लोकांना आश्रय दिलेल्या एका शाळेवर गुरुवारी इस्त्रायलने हल्ला केला. या हल्ल्यात 27 लोकांचा मृत्यू झाला. लेबनॉनबरोबरच इस्त्रायलने गाझातही (Gaza War) हल्ले सुरुच ठेवले आहेत.

Israel-Gaza Conflict: इस्राइलच्या गाझामध्ये पुन्हा बॉम्बहल्ला, 41 पॅलेस्टिनी ठार, हल्ल्याचे कारणही सांगितले

follow us