Download App

Plane Crash : इटलीत हवाई दलाची दोन विमानं कोसळली, पायलटचा मृत्यू, पाहा व्हिडिओ

Italian Airforce Planes Crash Video Viral On Social Media : इटलीमध्ये सरावादरम्यान इटालियन हवाई दलाची दोन विमानं कोसळून भीषण अपघात झाला आहे. ही घटना मंगळवारच्या सुमारास रोमच्या वायव्येस प्रशिक्षणादरम्यान घडली. या भीषण घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या भीषण घटनेनंतर इटालियन वायुसेनेने सांगितले की, दोन्ही वैमानिक हे इटालियन वायुसेनेच्या U-208 चे विमानात प्रशिक्षण घेत होते. त्यावेळी अचनक दोन्ही विमानं कोसळून अपघात झाला. यात दोन्ही विमानांच्या वैमानिकांचा मृत्यू झाला असून, हा अपघात नेमका का झाला, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

वाचा पाकिस्तानातील Punjab University होळी साजरी करणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला, 15 जखमी

इटलीच्या पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
दरम्यान, या भीषण अपघातानंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, गुइडोनियाजवळ प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाची दोन विमानं कोसळून अपघात झाला. यात दोन वैमानिकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून खूप दुःख झाले. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वैमानिकांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याची शक्ती मिळो ही देवाकडे प्रार्थना.

Bangladesh Explosion : ढाका स्फोटात 7 ठार, 70 हून अधिक जखमी

अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
दुसरीकडे, या विमानांच्या भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अपघातग्रस्त विमान कोसळल्यानंतर आगीच्या भक्क्ष्यस्थानी पडले. एक विमान रहिवासी भागात असणाऱ्या तर, दुसरे विमान जवळच असलेल्या शेतात कोसळले.

Tags

follow us