Download App

जपानचा अमेरिकेला दणका! अब्जावधी रुपयांची मोठी डील थांबवली; मोदींच्या जपान भेटीचा इफेक्ट?

जपानचे व्यापार वार्ताकार रयोसेई अकाजावा या डीलला अंतिम रुप देण्यासाठी अमेरिकेत जाणार होते. मात्र त्यांनी अचानक अमेरिका दौरा टाळला आहे.

Japan US Trade Deal : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या (Donald Trump) टॅरिफ धोरणाने जागतिक अर्थव्यवस्थेत खळबळ उडाली आहे. भारतावर थेट 50 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयावर जगभरातून टीका होत आहे. यातच आता जपाननेही अमेरिकेला जोरदार दणका (Japan US Trade Deal) दिला आहे. जपानने अमेरिकेत तब्बल 550 अब्ज डॉलरच्या (4.82 लाख कोटी) गु्ंतवणुकीला थांबवलं आहे. जपानचे व्यापार वार्ताकार रयोसेई अकाजावा या डीलला अंतिम रुप देण्यासाठी अमेरिकेत जाणार होते. मात्र त्यांनी अचानक अमेरिका दौरा टाळला आहे.

अमेरिका आणि जपान यांच्यात याआधी सहमती झाली होती की अमेरिका जपानाच्या उत्पादनांवरील टॅरिफ 25 टक्क्यांवरून 15 टक्के करील. जपान सुद्धा अमेरिकेत 550 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करील असेही ठरले होते. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी नंतर सांगितले की हा सगळा आमचाच पैसा आहे. आम्ही आमच्या मर्जीने या पैशांची गुंतवणूक करू आणि नफ्याचा 90 टक्के हिस्सा अमेरिकेकडेच राहील. त्यांचं हे वक्तव्य जपानी अधिकाऱ्यांना रुचलं नाही. गुंतवणूक परस्पर लाभाच्या सिद्धांतावर असायला हवी असे मत या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते.

बापरे! तब्बल 629 मिसाइल अन् ड्रोन्स युक्रेनवर धडकली, EU इमारत उद्धवस्त; 14 जणांचा मृत्यू

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ आदेशात सुधारणा करून ऑटो पार्ट्सवर शुल्क कमी करावे अशी मागणी जपानने केली आहे. ओव्हरलॅपिंग टॅरिफ रद्द केले पाहिजे. जपानचे प्रवक्ते योशिमासा हायाशी यांनी सांगितलं की अमेरिकी प्रशासनाच्या पातळीवर काही मुद्द्यांवर आणखी चर्चा होण्याची गरज आहे. यासाठीच आम्ही हा दौरा रद्द केला आहे असे स्पष्टीकरण जपानने दिले.

follow us