Download App

मोठी बातमी : जपानी संस्था ‘निहोन हिडांक्यो’ ला 2024 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर

  • Written By: Last Updated:

Japanese organization Nihon Hidankyo awarded Nobel Peace Prize 2024 : जपानी संस्था (Japan) ‘निहोन हिडांक्यो’ ला 2024 चा नोबेल शांतता पुरस्कार (Nobel Prize) जाहीर करण्यात आला आहे. आण्विक शस्त्रांविरुद्ध दिर्घकाळ मोहिम चालवल्याबद्दल या संघटनेला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात येत असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.  गेल्या वर्षी इराणी पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.

नॉर्वेजियन नोबेल समितीला यंदाच्या वर्षी शांती पुरस्कारासाठी 286 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये 89 संघटित आहेत. मागील वर्षी इराणी पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते नरगिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. नॉर्वेजियन नोबेल समितीने म्हटले आहे की ते “हिरोशिमा आणि नागासाकी येथील अणुबॉम्बच्या हल्ल्यात वाचलेल्यांचा सन्मान करीत आहोत. ज्यांना, शारीरिक दुःख आणि वेदनादायक आठवणी असूनही, शांततेसाठी आशा आणि प्रतिबद्धता जोपासण्यासाठी अनुभवाचा वापर करणे निवडले असल्याचं नॉर्वेजियन नोबेल समितीकडून स्पष्ट करण्यात आलंय.

सरकारी निर्णयांचा पाऊस! आचारसंहितेपूर्वी फक्त १० दिवसांत तब्बल १२९१ शासन निर्णय..

अमेरिकेतील पोर्टलॅंडस्थित लिनस पॉलिंग यांना आत्तापर्यंत दोनवेळा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. दोन पुरस्कार मिळालेल्यांपैकी पॉलिंग एकच व्यक्ती आहेत. एक नोबेल पुरस्कार केमिस्ट्रीसाठी तर दुसरा शांततेसाठी मिळाला होता. त्यांनी रासायनिक प्रक्रियेसाठी क्वांटम मॅकेनिक्सचा उपयोग केला होता. त्यानंतर त्यांनी परमाणू हत्यारांविरोधात जोमात अभियान चालवून परमाणू परीक्षणावर प्रतिबंध लागण्यासाठी याचिका दाखल केली होती.

‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार रिलीज, कुठे पाहाल? जाणून घ्या

केनियाच्या वांगारी मथाई नामक महिला प्रोफेसर या शांतता नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या पहिल्या आफ्रिकी महिला आहेत. त्यांनी ग्रीन बेल्ट नामक चळवळीची स्थापन केली होती. या चळवळीच्या माध्यमातून लाखो झाडांचं वृक्षारोपण करण्यात आले होते. याव्यतिरिक्त 2014 साली भारताच्या कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानमधील मलाला युसुफजई यांनाही शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता.

follow us