बदला घेणार आता थांबणार नाही…, खामेनी इज बॅक… ट्रम्प यांची धाकधूक वाढवणारा व्हिडिओ व्हायरल

Iran Israel America War : इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असणाऱ्या युद्धाचा आज 14 वा दिवस असून आतापर्यंत या युद्धातात 17 हजार

Iran Israel America War

Iran Israel America War

Iran Israel America War : इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असणाऱ्या युद्धाचा आज 14 वा दिवस असून आतापर्यंत या युद्धातात 17 हजार पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे तर अनेक जणांचा मृत्यू देखील झाला आहे. यातच इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींनी (Mojtaba Khamenei) यांनी आपल्या पहिल्या भाषणात पुन्हा एकदा अमेरिकेला इशारा दिला आहे. यापुढे देखील होर्मुझची सामुद्रधुनी (The Strait of Hormuz) बंदच राहणार असं त्यांनी ठणकावून सांगतिलं आहे. तसेच जेव्हापर्यंत मिनाबमधील शाळेतील निष्पापांच्या बळी बदला पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत इराण शांत बसणार नाही असं त्यांनी म्हटले आहे.  याच बरोबर त्यांनी या वर्षीच्या कुद्स दिनाच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभागी होऊन शत्रूला इराणची ताकद दाखवा असं आवाहन त्यांनी केला आहे.

अमेरिकेला (America) प्रत्युत्तर म्हणून इराण (Iran) इस्त्रायलसह (Israel) अरब देशातील अमेरिकन तळांवर जोरदार हल्ले करत आहे. या हल्ल्यात इस्त्रायल आणि अरब देशात मोठ्या नुकसान झाले असल्याची देखील माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे इराणी मीडियाकडून एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला खामेनी इज बॅक …असं नाव देण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्लात मृत्यू झालेल्या इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना दाखवण्यात आले आहे.

या व्हिडिओत खामेनी चालताना दिसत आहे. त्यांच्या हातात काठी असून खामेनींचं प्रतीक म्हणून असणारी अंगठी देखील या व्हिडिओत दाखवण्यात आली आहे. पुढे या व्हिडिओत अमेरिकेने इराणमधील मुलींच्या शाळेवर हल्ला करत 168 जणांचा मृत्यू झाला असं दाखवण्यात आले आहे. तर एक जण खामेनी इज डेड असं एक जण डोनाल्ड ट्रम्प यांना बोलत येतो. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना एक फोन येतो आणि समोरुन खामेनी इज बॅक असं म्हटलं जातं. यानंतर या व्हिडिओत इराणकडून आता मिसाईल हल्ले कशा पद्धतीने केले जातील याबाबत दाखवण्यात आले आहे.

सावध! राज्यात चार दिवस वादळी पाऊस अन् गारपिटी; ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी

28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात अली खामेनी यांच्यासह इराणचे 40 नेते मारले गेले होते. यानंतर इराणने प्रत्युत्तर देत इस्त्रायलसह अरब देशात असणाऱ्या अमेरिकन तळांवर जोरदार हल्ले सुरु केले आहे. तसेच होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली आहे.

‘आपली यारी… गावावर भारी!’ ‘पिफ्फ’ मध्ये तिहेरी सन्मान पटकावलेला ‘बाप्या’ 15 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला-

Exit mobile version