Hafiz Abdul Rehman Makki : मुंबई कथित हल्ल्याचा सूत्रधार आणि हाफिज सईदचा (Hafiz Saeed) नातेवाईक हाफिज अब्दुल रहमान मक्की (Hafiz Abdul Rehman Makki) याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, जमात-उद-दावाचा उपप्रमुख हाफिज अब्दुल रहमान मक्की गेल्या काही दिवसांपासून आजारी होता आणि त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होता मात्र शुक्रवारी सकाळी त्याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने त्याचा निधन झाला.
प्रमुख हाफिज सईदचा नातेवाईक असलेल्या मक्कीला दहशतवादविरोधी न्यायालयाने 2020 मध्ये सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. मक्की हा जमात-उद-दावाचा उपप्रमुख होता आणि दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर तो चर्चेत आला होता.
“Hafiz Abdul Rehman Makki passes away due to heart attack,” reports Pakistan’s Samaa TV.
Hafiz Abdul Rehman Makki was a wanted LeT terrorist who is also the brother-in-law of LeT leader Hafiz Saeed. pic.twitter.com/eK8eBN4y7w
— ANI (@ANI) December 27, 2024
तर दुसरीकडे पाकिस्तान मुत्ताहिदा मुस्लिम लीगने एका निवेदनात म्हटले आहे की, मक्की पाकिस्तानी विचारसरणीचा समर्थक होता. मक्कीला 2023 मध्ये संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी म्हणून नियुक्त केले होते, त्याच्यावर मालमत्ता गोठवणे, प्रवास बंदी आणि शस्त्रास्त्रे प्रतिबंधित करण्यात आले होते.
पंजाबमध्ये भीषण अपघात, बस नाल्यात पडली, 8 जणांचा मृत्यू; 21 जखमी
भारताविरुद्ध दहशतवादी योजना
अब्दुल रहमान मक्की यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. फेब्रुवारी 2010 मध्ये, मुंबई हल्ल्याच्या दोन वर्षानंतर, मक्कीने एका रॅलीत भारताला धमकी दिली होती की, काश्मीर पाकिस्तानला न दिल्यास, भारतात रक्ताच्या नद्या वाहू लागतील.