Indian Army in Maldiv : काही दिवसांपूर्वी मालदीवचे नवे राष्ट्रापती मोहम्मद मुइज्जू (Mohammed Muizzoo) यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेताच पहिल्याच दिवशी मालदीवमधून भारतीय लष्कर (Indian Army) बाहेर काढणार असं वक्तव्य केलं होतं. ते चीन समर्थक समजले जातात. दरम्यान, आता मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाने एक निवेदन जारी केलं. या निवेदनात म्हटले आहे की मालदीव सरकारने भारताला मालदीवमधून आपले सैन्य मागे घेण्याची औपचारिक विनंती केली आहे.
Maratha Reservation : ‘त्या’ पापाचे प्रायश्चित भोगावेच लागेल! मंत्री विखेंचा ‘मविआ’वर घणाघात
मालदीव भारताच्या लक्षद्वीपपासून 700 किमी अंतरावर आहे. भारतासाठी या देशाशी चांगले संबंध असणे महत्त्वाचे आहे. अन्यथा तेथे चीनची वाढती उपस्थिती भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. भारत आणि मालदीवमध्ये गेल्या सहा दशकांपासून राजनैतिक संबंध आहेत. भारताने वेळोवेळी मालदीवला सामाजिक आणि आर्थिक विकास, राष्ट्र उभारणी आणि सागरी सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात भरीव मदत केली आहे. मात्र, आता नवे राष्ट्रपतींनी भारतीय सैन्य बाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यांनी भरात सरकारला सैन्य मागं घेण्याबाबत सुचवलं.
Narendra Patil : ‘जरांगे पाटलांना डिवचलं तर आम्ही’.. नरेंद्र पाटील भुजबळांवर संतापले
मुइझू यांनी शनिवारी राष्ट्रपती कार्यालयात भारत सरकारचे मंत्री किरेन रिजिजू यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान औपचारिकपणे ही विनंती केली. मालदीवच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आले होते. यादरम्यान त्यांची मुइज्जूशी भेट झाली.
यानंतर मालदीवच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत वेबसाइटवर नंतर एक प्रेस रिलीज अपलोड करण्यात आले. यामध्ये भारतीय जवानांचाही उल्लेख आहे. त्यात म्हटले आहे की, मुइज्जू यांनी भारत सरकारला मालदीवमधून आपले सैन्य मागे घेण्याची औपचारिक विनंती केली आहे. पुढं लिहिलं आम्ही शतकानुशतके शांतताप्रिय देश आहोत. आमच्या भूमीवर परीकय सैन्य कधीच नव्हते. आमच्या भूमीवरील परदेशी सैन्याच्या उपस्थितीने आम्हाला सुरक्षित वाटत नाही. मालदीवच्या जनतेने सप्टेंबरमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत भारताकडे याबाबत मागणी करण्यसाठी त्यांना जनादेश दिला आण आशा व्यक्त केली की, भारत मालदीवच्या लोकाच्या इच्छेचा आदर करेल.
मोहम्मद मुइज्जू हे चीनच्या अगदी जवळचे असल्याचे म्हटले जात होते. मात्र, त्यांनी ही चर्चा फेटाळली. मुइज्जू म्हणाले, मी असे म्हणत नाही की भारतीय सैनिकांनी आमचा देश सोडल्यावर इथं चीनचं सैन्याला जागा मिळेल. आपण केवळ मालदीवचे समर्थक असून चीन किंवा इतर कोणत्याही देशाला भारतीय सैनिकांची जागा घेऊ देणार नाही, असं स्पष्ट केलं.