Narendra Patil : ‘जरांगे पाटलांना डिवचलं तर आम्ही’.. नरेंद्र पाटील भुजबळांवर संतापले

Narendra Patil : ‘जरांगे पाटलांना डिवचलं तर आम्ही’.. नरेंद्र पाटील भुजबळांवर संतापले

Narendra Patil : जालना जिल्ह्यातील अंबड येथे काल ओबीसी आरक्षण एल्गार सभा (OBC Reservation) आयोजित करण्यात आली होती. या सभेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर भुजबळ यांच्यावरही टीका होत आहे. माजी आमदार नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी आता भुजबळ यांच्यावर सडकून टीका करत त्यांना इशारा दिला आहे. भुजबळ आधीपासूनच मराठा द्वेषी आहेत. आम्ही जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या पाठिशी ठाम उभे आहोत. जरांगे पाटलांना डिवचलं तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला.

कालच्या सभेतून भुजबळांची वैचारिक भूमिका समोर आली आहे. त्यांनी आतापर्यंत विविध पदांवर काम केलं आहे. मराठा समाजाच्या सहकार्यानं काम केल्याचं ते म्हणतात पण त्यांची वैचारिक भूमिका काय आहे हे ओबीसी एल्गार सभेतून समोर आली आहे. तुम्ही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जरूर मांडा. त्याच्याशी आम्हाला देणघेणं नाही. पण, जरांगे पाटलांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं तर जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा नरेंद्र पाटलांनी दिला.

Jayant Patil : मोदीजी, फित कापून खुशाल श्रेय घ्या! ‘निळवंडे’ची आठवण सांगत जयंत पाटलांचा टोला

भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा 

छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणीही संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube