लाहोरमधील नावे बदलली ! प्रसिद्ध इस्लामपुरा आता कृष्णनगर, बाबरी मस्जिद चौकाचे नाव जैन मंदिर चौक

Lahore-अनेक ऐतिहासिक रस्ते आणि गल्ल्यांना हिंदू, शीख आणि ब्रिटिशांची नावे देण्यात आली होती. फाळणीनंतर, त्यांना इस्लामिक, पाकिस्तानी किंवा स्थानिक व्यक्तींची नावे देण्यात आली आहे.

Lahore

Lahore

Krishan Nagar in Lahore: इस्लामपुरा आता कृष्णनगर, बाबरी मस्जिद चौकाएेवजी जैन मंदिर चौक, सुन्नतनगर आता संतनगर हे बदलेली नावे आपल्या देशातील नाहीत. हे चक्क पाकिस्तानमध्ये (Pakistan) घडलंय. पाकमधील पंजाबच्या मुख्यमंत्री मरियन नवाज यांच्या सरकारने लाहोरमधील रस्ते आणि गल्ल्यांची नावे बदलण्यास मंजुरी दिलीय. पाकच्या निर्मितीनंतर 79 वर्षांनी लाहोरमधील एका घडामोडीमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

लाहोरमध्ये अनेक ऐतिहासिक रस्ते आणि गल्ल्यांना हिंदू, शीख आणि ब्रिटिशांची नावे देण्यात आली होती. फाळणीनंतर, त्यांना इस्लामिक, पाकिस्तानी किंवा स्थानिक व्यक्तींची नावे देण्यात आली आहे. पंजाब सरकारच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. ते म्हणाले काही दिवसांपूर्वी, मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंजाब मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाहोर आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील विविध रस्ते आणि गल्ल्यांची मूळ आणि ऐतिहासिक नावे पुनर्संचयित करण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली.

ही नामांतर मोहीम ‘लाहोर अथॉरिटी फॉर हेरिटेज रिवाइव्हल’ (LAHR) नावाच्या एका व्यापक शहरी संवर्धन उपक्रमाचा भाग आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे त्याचे प्रमुख संरक्षक आहेत. हा अंदाजे 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचा प्रकल्प आहे. याची सुरुवात पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी 2025 मध्ये केलीय.


30 वर्षांनंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक यांची जोडी रंगभूमीवर परतणार


लाहोरमधील कोणत्या रस्त्यांची नावे बदलण्यात आली?

प्रसिद्ध इस्लामपुराचे नाव बदलून कृष्ण नगर ठेवण्यात आलंय. बाबरी मशीद चौकाचे नाव बदलून जैन मंदिर चौक ठेवण्यात आलंय. सुन्नतनगरचे नाव बदलून संतनगर, मौलाना जफर अली खान चौक आता लक्ष्मी चौक, मुस्तफाबादचे नाव आता अधिकृतपणे धरमपुरा आणि सर आगा खान चौकाचे नाव बदलून डेव्हिस रोड ठेवण्यात आलंय. याशिवाय, अल्लामा इक्बाल रोडचे नाव बदलून जेल रोड ठेवण्यात येत आहे. फातिमा जिना रोड पुन्हा क्वीन्स रोड झाला आहे आणि बाग-ए-जिनाचे नाव बदलून आता लॉरेन्स गार्डन्स ठेवण्यात आलंय.

नशेचं इंजेक्शन अन् सामुहिक बलात्कार, NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीसोबत क्रूर कृत्य


मिंटो पार्कमधील तीन क्रिकेट मैदाने आणि एका आखाड्याचे नूतनीकरण

मिंटो पार्कमधील (ग्रेटर इक्बाल पार्क) तीन क्रिकेट मैदाने आणि एका पारंपरिक ‘आखाड्या’च्या (कुस्तीचा आखाडा) पुनर्स्थापनेचा प्रस्तावही दिला आहे, ज्याकडे नुकसानीची भरपाई करण्याची एक रणनीती म्हणून पाहिले जात आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंजाबचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात शहरी विकास कार्यक्रमाचा भाग म्हणून तीन ऐतिहासिक क्रिकेट मैदाने, क्रिकेट क्लबच्या मालकीच्या जागा आणि एक कुस्तीचा आखाडा पाडल्याबद्दल 2015 मध्ये तीव्र टीकेला समोर जावे लागले होते.


लाला अमरनाथ मिंटो पार्कमध्ये सराव करायचे

पाकिस्तानचे माजी क्रिकेट कर्णधार इंझमाम-उल-हक यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी मिंटो पार्कमधील या क्रिकेट क्लबमध्ये सराव केला आहे. फाळणीपूर्वी, भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांनी येथे सराव केलेला आहे. 1978 मध्ये जेव्हा अमरनाथ भारतीय क्रिकेट संघासोबत लाहोरला गेले होते, तेव्हा त्यांनी मिंटो पार्कला भेट दिली होती आणि क्रेसेंट क्रिकेट क्लबच्या खेळाडूंसोबत वेळ घालवला होता. तो फाळणीपर्यंत क्लबसाठी खेळला. मिंटो पार्कमधील आता पाडलेल्या कुस्तीच्या आखाड्यात एकेकाळी गंगा पैलवान, इमाम बख्श आणि गामा पैलवान यांसारख्या दिग्गज पैलवानांचे सामने आयोजित केले जात असत. फाळणीपूर्वी हिंदू मिंटो पार्कमध्ये दसरा साजरा करत असत.

Exit mobile version