Hindu Succession Act : महिलांनो, लग्नानंतर संपत्तीचा वारसदार कोण? पती की पालक; जाणून घ्या कायदा

Hindu Succession Act :  आजच्या काळात अनेक महिला नोकरी करुन किंवा व्यवसाय करुन मोठी संपत्ती निर्माण करत आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का?

Hindu Succession Act

Hindu Succession Act :  आजच्या काळात अनेक महिला नोकरी करुन किंवा व्यवसाय करुन मोठी संपत्ती निर्माण करत आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? जर एखाद्या हिंदु महिलेचे मृत्यूपत्र न करता निधन झाले तर तिच्या संपत्तीचे वारासदार नेहमी पालक असेल असे नाही. ‘हिंदू वारसा हक्क कायदा, 1956 नुसार काही विशिष्ट परिस्थितींमध्ये तिची संपत्ती सर्वप्रथम तिच्या पतीच्या कायदेशीर वारसांकडे जाऊ शकते.

कायदा काय सांगतो?

हिंदू वारसा हक्क कायद्याच्या (Hindu Succession Act) कलम 15 नुसार, जर एखाद्या हिंदू महिलेचे मृत्युपत्र न करता निधन झाले, तर तिच्या संपत्तीच्या वारसाहक्काबाबत एक विशिष्ट प्राधान्यक्रम पाळला जातो. यात तिची मुले, मुली आणि पती यांना पहिला हक्क असतो. जर हे कोणीही हयात नसेल, तर ती संपत्ती तिच्या पतीच्या कायदेशीर वारसांकडे जाते. त्यानंतरच तिचे पालक आणि त्यानंतर त्यांचे वारस यांचा विचार केला जातो. अनेक प्रकरणांमध्ये तिच्या स्वतःच्या पालकांपूर्वी तिच्या पतीच्या कुटुंबाला ती संपत्ती मिळू शकते.

हा नियम कधी लागू होतो?

जर महिलेला मुले नाहीत आणि तिचा पती देखील जगात नाही आणि महिलेने  स्वतःच्या कमाईतून घर, जमीन किंवा इतर मालमत्ता मिळवली असेल पण मृत्युपत्र केले नसेल, तर तिची संपत्ती सर्वप्रथम तिच्या पतीच्या कायदेशीर वारसांकडे जाऊ शकते. तिचे पालक किंवा त्यांचे वारस त्यानंतरच त्यावर दावा करू शकतात.

वारसाहक्काने मिळालेली वडिलोपार्जित मालमत्ता अपवाद 

तर दुसरीकडे या नियमाला एक महत्त्वाचा अपवाद आहे. जर एखाद्या महिलेला तिच्या पालकांकडून मालमत्ता वारसाहक्काने मिळाली असेल आणि तिला मुले नसताना तिचे निधन झाले, तर अशी मालमत्ता तिच्या पतीच्या कुटुंबाकडे जाण्याऐवजी तिच्या वडिलांच्या कायदेशीर वारसांकडे परत जाऊ शकते. म्हणजेच वारसाहक्काने मिळालेली वडिलोपार्जित मालमत्ता आणि स्वतः कमावलेली मालमत्ता यांच्याबाबतचे नियम वेगळे असू शकतात.

पाकिस्तानातील हिंदू भारतातील हिंदूंपेक्षा अधिक आनंदी; राष्ट्रपती आसिफ अली झरदारींचे वक्तव्य चर्चेत-

वेळेवर पावले उचलणे

कायदेतज्ज्ञांचे असे मत आहे की, काळ बदलत असताना स्त्रिया अधिकाधिक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत आहेत आणि अनेक प्रकरणांमध्ये त्या आपल्या पालकांप्रती असलेल्या आर्थिक व सामाजिक जबाबदाऱ्याही पार पाडत आहेत. अशा परिस्थितीत, जर एखाद्या महिलेची इच्छा असेल की तिने स्वतः कमावलेली मालमत्ता तिच्या पालकांकडे, भावंडांकडे किंवा तिच्या पसंतीच्या इतर कोणत्याही व्यक्तीकडे जावी, तर तिने वेळेवर कायदेशीररीत्या वैध मृत्युपत्र तयार केले पाहिजे. असे केल्याने वारसाहक्काशी संबंधित भविष्यातील वाद टाळण्यासही मदत होऊ शकते.

follow us