पाकिस्तानातील हिंदू भारतातील हिंदूंपेक्षा अधिक आनंदी; राष्ट्रपती आसिफ अली झरदारींचे वक्तव्य चर्चेत

Asif Ali Zardari : पाकिस्तानातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवरून सातत्याने प्रश्न उपस्थित होत असतानाच राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचे एक

Asif Ali Zardari

Asif Ali Zardari : पाकिस्तानातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवरून सातत्याने प्रश्न उपस्थित होत असतानाच राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचे एक वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. पाकिस्तानातील हिंदू भारतातील हिंदूंपेक्षा अधिक आनंदी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पाकिस्तानातील मुस्लिम हिंदूबाबत सहिष्णुता बाळगतात, त्यामुळे तेथे हिंदू अधिक मुक्त आणि सुरक्षित असल्याचे झरदारी यांनी म्हटल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तानातील एका कार्यक्रमात बोलताना झरदारी (Asif Ali Zardari) यांनी भारत आणि पाकिस्तानमधील धार्मिक परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी भारतातील लोकांचा दृष्टिकोन आणि ‘अखंड भारत’ या संकल्पनेचाही उल्लेख केला. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाली आहे.

आम्ही हिंदूंबाबत सहिष्णुता बाळगतो – झरदारी 

झरदारी यांनी पाकिस्तानच्या (Pakistan) लोकसंख्येत हिंदूंचे प्रमाण सुमारे चार टक्के असल्याचा उल्लेख केला. पाकिस्तानातील मुस्लिम इतर धर्मीयांबाबत सहिष्णुता दाखवतात आणि त्यामुळे हिंदूंना तेथे स्वातंत्र्य मिळते, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानातील हिंदूंना इतर ठिकाणांपेक्षा आपल्या देशात अधिक मोकळेपणाने आणि चांगल्या परिस्थितीत राहता येते. त्यामुळे भारतात राहण्यापेक्षा पाकिस्तानातील मुस्लिमांसोबत राहणे हिंदूंना अधिक पसंत असल्याचेही त्यांनी म्हटले.

आपल्या वक्तव्यात झरदारी यांनी भारतीयांच्या दृष्टिकोनावरही भाष्य केले. भारतातील लोक ‘अखंड भारत’ या विचारावर विश्वास ठेवतात, मात्र या विचाराशी संबंधित काही बाबी विसरल्या गेल्या आहेत, असा दावा त्यांनी केला. भारत आणि पाकिस्तानमधील धार्मिक परिस्थितीची तुलना करताना त्यांनी पाकिस्तानातील हिंदूंच्या स्थितीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला.

‘या’ राशींना आज होणार व्यवसायात फायदा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे भविष्य

अल्पसंख्याकांच्या स्थितीवर प्रश्न  

विशेष म्हणजे, पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या स्थितीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध मंचांवरून प्रश्न उपस्थित केले जात असतानाच झरदारी यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. पाकिस्तानातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या हक्कांबाबत यापूर्वीही विविध अहवाल आणि संस्थांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी आपल्या देशातील हिंदूंची स्थिती भारतातील हिंदूंपेक्षा चांगली असल्याचा केलेला दावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

follow us