CJP Protests : CJP च्या आंदोलनामागे पाकिस्तान? सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरु
CJP Protests : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोज जनता पार्टीकडून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे.
CJP Protests : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोज जनता पार्टीकडून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. 20 जुलैपासून सुरु झालेल्या या आंदोलनात पोलिसांकडून अनेक विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता या आंदोलनाला परदेशी कट असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात सुरक्षा यंत्रणांनी तपास देखील सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणा आंदोलनादरम्यान झालेली हिंसा, ऑनलाइन मोहीम आणि कथित विदेशी संबंध यांसारख्या विविध पैलूंचा तपास करत आहेत. एका डिजिटल मोहिमेचे (CJP Protests) वेगाने मोठ्या आंदोलनात कसे रुपांतर झाले आणि त्यानंतर परिस्थिती कशी हिंसक बनली याचा आता तपास करण्यात येत आहे. सध्या तपास यंत्रणांकडू ज्या सोशल मीडिया खात्यांनी आणि डिजिटल नेटवर्कनी या आंदोलनाला मोठी गती मिळवून दिली, त्यांची कसून तपासणी केली जात आहे.
मीडिया अहवालानुसार, तपास यंत्रणांना या प्रकरणाचा तपास करत असताना पाकिस्तानशी संबंध असण्याची शक्यता असलेली संशयास्पद ‘हँडल्स’ आढळून आली आहेत. आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने झालेली दुखापत आणि अटकेबाबत दिशाभूल करणारे दावे पसरवण्यासाठी या खात्यांचा वापर करण्यात आला असल्याची शक्यता तपास यंत्रणांकडून वर्तवण्यात येत आहे.
आंदोलनाचा प्रचार करण्यासाठी इंस्टाग्राम (Instagram) आणि ‘एक्स’ सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला होता. तपास यंत्रणांना अशी नवीन सोशल मीडिया पेजेसही सापडली आहेत, ज्यांनी अत्यंत कमी कालावधीत लाखो फॉलोअर्स मिळवले आहेत असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता संबंधित खाती आणि त्यांचे आयपी डिजिटल हालचालींची तपासणी करण्यात येत आहे.
आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार; इराणकडून युद्धाची घोषणा; आखाती देशांमध्ये पुन्हा तणाव –
या आंदोलनाशी संबंधित जाहीरनामे, पोस्टर्स, वेबसाइट्स आणि इतर साहित्य तयार करण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) साधनांचा वापर केल्याचेही तपासात समोर आले आहे. या तंत्रांचा वापर केवळ आंदोलनापुरता मर्यादित होता की त्यामागे एखादी सुनियोजित डिजिटल रणनीती होती, हे शोधण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणा करत आहेत.