Ram Mandir : सध्या देशभरात सर्वत्र 22 जानेवारीला होणारा अयोध्येतील राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा आणि श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना सोहळा यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याच आनंदाच्या वातावरणात आथा मॉरिशस देशही सहभागी होणार आहे. मॉरिशस सरकारने या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 22 जानेवारीला हिंदू कर्मचाऱ्यांसाठी दोन तासांच्या विशेष सुट्टीची घोषणा केली आहे. (Mauritius government has announced a two-hour special holiday for Hindu employees on January 22 in view of the Ram Mandir celebrations in Ayodhya)
याबाबत मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांच्या नेतृत्वाखालील मॉरिशस मंत्रिमंडळाने शुक्रवारी अधिकृत निवेदन जारी केले. यात म्हंटले आहे की, भारतातील अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील हिंदू कर्मचारी बांधवांना सोमवारी, 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी दोन वाजल्यापासून दोन तासांची विशेष सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. देशातील विविध ठिकाणी राम मंदिर सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण दिवाळी सणासारखाच साजरा करण्यात यावा, असे आवाहन भाजप नेत्यांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरात दिवे लावून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहेत.
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील गर्भवती मातांनी एक अजब मागणी केली. त्यांच्या मागणीमुळे रुग्णालय प्रशासन देखील चक्रावून गेले आहे. प्राणप्रतिष्ठापणेचा मुहूर्त अत्यंत शुभ आहे. त्यामुळेच अयोध्येमध्ये ज्या गर्भवती मातांची प्रसूतीची तारीख 22 जानेवारीच्या आसपास आहे. त्यांच्याकडून मागणी करण्यात येत आहे की, आमची प्रसूती ही 22 जानेवारीलाच करण्यात यावी. त्यासाठी या महिलांनी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने अर्ज करायला सुरुवात केली आहे.