Netanyahu On Strait Of Hormuz Crisis : मध्य पूर्वेचा भडका…आकाशातून कोसळणारी क्षेपणास्त्रे… आणि जगाची वाढलेली धडधड. युद्धाच्या या धुराड्यात आता एक असा ‘मास्टरस्ट्रोक’ खेळला गेलाय, जो इराणचा अहंकार धुळीला मिळवू शकतो. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जगासमोर एक असा प्रस्ताव मांडलाय, जो केवळ इराणची नाकेबंदी करणार नाही, तर येणाऱ्या दशकातलं जागतिक राजकारण आणि ऊर्जेचं समीकरण कायमचं पालटून टाकेल! काय आहे हा ‘गेमचेंजर’ प्लॅन? जाणून घेऊया…
Iran War : इराणचाही ‘लिबिया’ होणार? अमेरिकेच्या 15 अटीत दडलाय गद्दाफींसारखाच विनाशाचा सापळा
जगाला वेठीस धरणारा एक ‘चोक पॉईंट’ म्हणजेच स्ट्रेट ऑफ होर्मुझ होय. जगाचं २०% कच्चं तेल याच चिंचोळ्या समुद्रातून जातं. एका बाजूला इराणची लष्करी ताकद आणि दुसऱ्या बाजूला खाडी देशांची संपत्ती… इथली भौगोलिक स्थिती इतकी स्फोटक आहे की, इथला लहानसा तणावही जगाच्या अर्थव्यवस्थेला ‘हार्ट अटॅक’ देऊ शकतो. म्हणूनच, प्रत्येक युद्धाच्या वेळी जेव्हा तेल महाग होतं, तेव्हा त्याचं मूळ या ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’च्या धोक्यात सामावलेलं असतं.
समुद्राला पर्याय जमिनीचा
जगाच्या प्रगतीला इराणच्या ‘होर्मुझ’ विळख्यातून सोडवण्यासाठी आणि वारंवार उद्भवणाऱ्या जागतिक तेल संकटावरचा एकमेव शाश्वत तोडगा म्हणजे ‘समुद्री मार्गावरील विसंबून राहणे’ पूर्णपणे थांबवणे. नेतन्याहू यांनी जो क्रांतीकारी प्रस्ताव दिला आहे त्यात त्यांनी खाडी देशांतील तेल आणि वायूचा पुरवठा आता ‘होर्मुझ’च्या धोकादायक मार्गाऐवजी, जमिनीखालून जाणाऱ्या अवाढव्य पाईपलाईनद्वारे व्हावा असा प्रस्ताव ठेवला आहे. ही पाईपलाईन सौदी अरेबियाच्या भूप्रदेशातून थेट तांबड्या समुद्रापर्यंत (Red Sea) आणि तिथून भूमध्य समुद्रापर्यंत (Mediterranean Sea) जोडली जाईल. असे झाल्यास इराणच्या नियंत्रणाखालील ‘चोक पॉईंट’ पूर्णपणे बायपास होईल. कारण इराण जगाला नेहमी ‘होर्मुझ’च्या मार्गावरून तेल पुरवठा बंद करण्याची धमकी देतो, कारण त्या मार्गावर त्याचे नियंत्रण आहे.
नेतन्याहू यांचा प्लॅन आकर्षक पण तितकाच धोक्याचा
नेतन्याहू यांचा कागदावर आखलेला प्लॅन दिसायला जेवढा आकर्षक वाटतोय मात्र, प्रत्यक्षात तो तेवढाच आव्हानात्मक आणि गुंतागुंतीचा आहे. यातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे सौदी अरेबियाची संमती. कारण या पाईपलाईनचा संपूर्ण मार्ग सौदीच्या भूभागातून जाणार आहे. अरब देश आणि इस्रायल यांच्यातील नातेसंबंध नेहमीच तणावाचे राहिले आहेत, त्याचा परिणाम या कामावर होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे, या कामासाठी लागणारा अफाट पैसा आणि वेळ आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जमिनीवरील या मार्गाला असणारा सुरक्षिततेचा धोका. कारण भविष्यात युद्ध झाले किंवा दहशतवादी हल्ला झाला, तर ही पाईपलाईन तोडणे शत्रूसाठी सोपे असेल. त्यामुळे नेतन्याहू यांचा हा प्लॅन जितका आकर्षक आहे, तितकाच तो धोकादायकही आहे.
…तर जगाचा जिओ पॉलिटिकल मॅप पूर्णपणे बदलेल
पण, जर जर नेतन्याहू यांचा हा मास्टर प्लॅन वास्तवात उतरला, तर जगाचा ‘जिओ-पॉलिटिकल मॅप’ कायमचा बदललेला असेल. समुद्री मार्गांची मक्तेदारी संपून पाईपलाईन कॉरिडॉर जागतिक ऊर्जेचा नवा कणा बनेल. यामुळे तेलाच्या किमतींमधील अनिश्चितता संपुष्टात येईल आणि मध्य पूर्वेतील सत्तेचं पारडं पूर्णपणे फिरेल. या नव्या रचनेत सौदी अरेबिया हा जागतिक ऊर्जेचा सर्वात शक्तिशाली केंद्रबिंदू बनेल, तर दुसरीकडे इराणचा जगाला वेठीस धरण्याचा प्रभाव पार पुसून टाकला जाईल.
होर्मुझचं संकट हे केवळ दोन देशांमधील युद्धाचा मुद्दा नाही, तर तेथील ‘भूगोलाने’ निर्माण केलेला एक सापळा आहे. नेतन्याहू यांचा हा प्रस्ताव नेमका याच भूगोलाला आव्हान देण्याचा प्रयत्न आहे. जगाला अशा एका समुद्री मार्गाच्या विळख्यातून सोडवणं, जो कधीही कोणा एका देशाच्या मर्जीने बंद केला जाऊ शकतो, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. अर्थात, नेतन्याहू यांचे हे स्वप्न पूर्ण होण्यात अनेक राजकीय आणि धोरणात्मक अडथळे आहेत. पण, जर हा प्रयत्न यशस्वी झाला, तर 21 व्या शतकातील हा जागतिक ऊर्जेचा सर्वात मोठा एनर्जी शिफ्ट ठरेल. नेतन्याहूंचा हा ‘पाईपलाईन फॉर्म्युला’ म्हणजे इराणला दिलेला थेट ‘चेकमेट’ आहे.
