Download App

टायटॅनिकचे अवशेष शोधण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचे काय झाले? ‘इतक्या’ तासांचाच ऑक्सिजन शिल्लक

समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष शोधण्यासाठी गेलेल्या बेपत्ता पाणबुडीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ब्रिटीश रॉयल नेव्हीचा एक तज्ञ पाणबुडी, फ्रेंच ROV तज्ञांची एक टीम आणि महाकाय अधिक जहाजे या शोधकार्यात सामील होत आहेत, असे तटरक्षक दलाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी एजन्सीच्या पाणबुडीसह अमेरिका, कॅनडाच्या नेवी फोर्सकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, या पाणबुडीत आता केवळ 55 तासांचा ऑक्सिजन शिल्लक असल्याची माहिती आहे. (The 22-foot submersible was carrying five people in a dive to the wreckage site of the Titanic and it lost contact with a support ship)

1992-13 साली समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष शोधण्यासाठी ओशनगेट नामक कंपनीच्या या छोट्या पाणबुडीमध्ये पाच जण गेले होते. या पाणबुडीत एका नाविकासह इतर चार जणांचा समावेश आहे. सिर्फट टाईटन असं या पाणबुडीचं नाव असून पाणबुडीने समुद्रात डुबकी घेतल्यानंतर दोन तासांतच संपर्क तुटला आहे. या पाणबुडीचे वजन 10 हजार 432 किलो असून पाणबुडी 13 हजार 100 फूट खोलीपर्यंत पोहोचू शकते.

IND Vs PAK फुटबॉल: एकटा भारतीय प्रशिक्षक भिडला पाकिस्तानी खेळाडूंशी, व्हिडिओ व्हायरल

कोण आहे या पाणबुडीमध्ये?

या बेपत्ता पाणबुडीमध्ये नाविकसह पाकिस्तानचे उद्योगपती प्रिन्स दाऊद, त्यांचा मुलगा सुलेमान आणि ब्रिटीश उद्योगपती हमिश हार्डिंग यांचा समावेश आहे. दरम्यान, टायटॅनिकच्या शोधासाठी निघालेल्या हार्डिंग यांनी जाण्याआधी सोशल मिडियावर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये ते म्हणाले, “मला हे सांगताना अभिमान वाटतो की मी, टायटॅनिकच्या मोहिमेचा एक भाग असल्याचं ते म्हणाले होते.

Manipur Violence : हिंसाचारामुळे देशाच्या आत्म्याला खोल जखम; सोनिया गांधींचे व्हिडिओच्या माध्यतातून शांततेचं आवाहन

तसेच पाणबुडीच्या प्रवासाला गेलेल्यांपैकी प्रिंन्स दाऊद हे पाकिस्तानातील श्रीमंत कुटुंबापैकी एक आहेत. ते SETI संस्थेचे विश्वसही आहेत. तर या पाणबुडीच्या पायलटचे नाव पॉल हेन्री असून तो फ्रान्सचा रहिवासी आहे. या पाणबुडीमध्ये प्रवास करण्यासाठी पर्यटकाला 2 कोटी 28 लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. हा प्रवास न्यूफाउंडलंडमधील सेंट जॉन्सपासून सुरू होत असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

Tags

follow us