Download App

Morocco Earthquake : इमारती जमिनदोस्त, रस्त्यांवर मृतदेह; मृतांचा आकडा वाढला, तीन दिवसांचा दुखवटा…

Morocco Earthquake : मोरक्कोमध्ये घडलेल्या शक्तीशाली भूकंपामुळे मोरक्को देश चांगलाच हादरुन गेला आहे, या भीषण भूकंपामध्ये 2 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मोरक्कोमध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, भूकंपानंतर मोरक्कोमधील भूकंपग्रस्त भागात बचावकार्य सुरु असून अनेक भागांत मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याचं दिसून येत आहे.

G20 Summit : पारंपारीक पोशाखात दिग्गज नेत्यांच्या पत्नी, बायडेन यांना आवरला नाही शेख हसीनांसोबत सेल्फीचा मोह

मोरक्कोमधील अजीलाल आणि युसूफिया प्रदेशाबरोबर मरक्केश, अगादीर आणि कॅसाब्लांका प्रदेशामध्ये सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सुरुवातील 600 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं त्यानंतर 1 हजार आता जवळपास दोन हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मोरक्कोमध्ये झालेल्या भयावह भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करुन दुख: व्यक्त केलं आहे. तसेच मोरक्कोला मदत देण्याचंही आश्वासन पंतप्रधानांनी दिलं आहे.

आरक्षणावरून दोन समाजात वाद निर्माण करू नका अन् अकलेचे तारे तोडू नका; बावनकुळेंचा इशारा

भूकंपाची तीव्रता किती?
मोरक्कोमध्ये रात्री 11 : 11 च्या सुमारास नैऋत्येस 44 मैल (71 किलोमीटर) 18.5 किलोमीटर खोलीवर झाला होता. मोरोक्कोच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि नेटवर्कने रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7 एवढी मोजली, तर यूएस एजन्सीने भूकंपाच्या 19 मिनिटांनंतर 4.9 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=7DOsNyIkNfE

दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री मोरक्कोमध्ये भूंकप झाला आहे. यात सुरुवातीला सहाशेहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. परंतु त्यानंतर बचाव कार्यात मृतांची संख्या वाढत गेली आहे. सर्वाधिक नुकसान हे शहराजवळ असलेल्या जुन्या वस्त्यांमध्ये झाला असून मोरक्कोतील नागरिकांनी त्याचे व्हिडिओ आणि फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात इमारती कोसळल्यानंतर धुळींचे लोट उसळल्याचे दिसत आहे. मरक्केश येथे ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटक हे जीव वाचविण्यासाठी पळापळ करत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

Tags

follow us