पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी जून महिन्यात पुन्हा एकदा अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन पंतप्रधान मोदींचे यजमानपद भूषवणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यासाठी व्हाईट हाऊसमधून नियोजन सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार व्हाईट हाऊसशी निगडित लोकांनी सांगितले की या वर्षी जूनमध्ये राष्ट्राध्यक्ष बिडेन पंतप्रधान मोदींसाठी स्टेट डिनरचे आयोजन करतील.
मीडिया रिपोर्टनुसार पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान दोन्ही देश सध्या सुरू असलेल्या इंडो-पॅसिफिक आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या चर्चेला पुढे नेतील. पंतप्रधान मोदींच्या या औपचारिक दौऱ्यात अमेरिका-भारत संबंध अधिक दृढ होतील. चीनकडून वाढता धोका लक्षात घेता दोन्ही देशांना इंडो-पॅसिफिक धोरणे आणि उपक्रम पुढे न्यायचे आहेत. असं या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटतं.
जून महिन्यातील व्हाईट हाऊसमधील या स्टेट डिनरनंतर दोन्ही नेते याच वर्षी सप्टेंबरमध्ये 18 व्या G20 शिखर परिषदेतही भेटतील. भारत यावर्षी G20 शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. या शिखर परिषदेत युक्रेन-रशिया युद्धावरही चर्चा होणार आहे. मात्र, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन जी-20 परिषदेला उपस्थित राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पंतप्रधान मोदी जर जून महिन्यात अमेरिकेत गेले आणि बिडेन यांच्याकडून आयोजित स्टेट डिनरला उपस्थित राहिले, तर ही तिसरी वेळ असेल जेव्हा बिडेन यांच्याकडून एखाद्या नेत्याला हा सन्मान दिला गेला. यापूर्वी त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांच्यासाठी स्टेट डिनरचे आयोजन केले होते.
ChatGPT च्या नवीन आवृत्तीने जगाला केले चकित, आजारावरही सांगते नेमके औषध