Download App

दुसऱ्या ग्रहावरही जीवन? NASA च्या रिपोर्टमध्ये नेमकं काय?

NASA : अमेरिकी अंतराळ संस्था नासाने (NASA) गुरुवारी युएफओवर (Unidentified Flying Object) आधारीत अहवाल प्रसिद्ध केला. या विषयावर संस्थेने जवळपास एक वर्ष अभ्यास केला त्यानंतर हा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. 33 पानांच्या या अहवालात म्हटले आहे, की ठाऊक नसणाऱ्या किंवा आपल्याला न समजणाऱ्या घटनांमागे एलियन्सच आहेत याचे कोणतेच पुरावे नाहीत. मात्र, हा दावा करताना नासाने एलियन्सच्या शक्यतेला नकारही दिलेला नाही.

या विषयावर अधिक सविस्तर अभ्यास करण्यासाठी नवीन वैज्ञानिक तंत्रे आणि प्रगत उपग्रहांची आवश्यकता राहिल असे नासाने (NASA) म्हटले आहे. युएफओ हे आपल्या ग्रहाचे सर्वात मोठे रहस्य आहे हे नासाने कबूल केले आहे. पृ्थ्वीशिवाय या विश्वात आणखी कुठे जीवसृष्टी आहे, असा नासाचे व्यवस्थापक बिल नेल्सन यांना विश्वास असल्याचे संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध करताना म्हटले आहे.

Tharman Shanmugarratnam : सिंगापूरमध्ये भारतीय वंशांचे राष्ट्राध्यक्ष, थर्मन षण्मुगररत्नम यांनी घेतली शपथ 

नासाने (NASA) सांगितले की आता ज्या नव्या योजनेच तयारी केली जात आहे त्यामध्ये ग्रहाच्या वातावरणात आणि पृष्ठभागावर एलियन तंत्रज्ञान शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. युएफओवरील संशोधनासाठी नवीन संचालकांची घोषणा करण्यात येणार आहे. पृथ्वीचे निरीक्षण करणाऱ्या उपग्रहांमध्ये अवकाशीय रिजोल्यूशनची कमतरता असते ज्यामुळे युएफओ किंवा युएपी सारख्या लहान वस्तूंचे निरीक्षण करता येत नाही. याआधी एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता ज्यामध्ये नौदलाच्या वैमानिकांनी अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर काही रहस्यमय विमाने पाहिली होती. या विमानांचा वेग सध्याच्या विमान वाहतूक तंत्रज्ञानापेक्षा जास्त होता आणि विमानाची रचनाही अनाकलनीय होती. त्यामुळे उड्डाण कुठून नियंत्रित केले जात होते हे कळू शकले नाही.

नासाने (NASA) सांगितले की एआय आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या मदतीने युएफओचा अभ्यास केला जाईल. या वर्षाच्या सुरुवातीला नासाच्या टीमने आग्रह धरला होता की युएफओशी संबंधित अलौकिक जीवनाचा कोणताही पुरावा नाही. परंतु, आता ताज्या अहवालात नासाने मान्य केले आहे की आपल्या ग्रहाबाहेरबी जीवन असू शकते. नासाने सांगितले की अद्याप पुरेसा डेटा नाही त्यामुळे युएफओबाबत आताच काही निष्कर्ष काढता येणार नाही.

सर्वसामान्यांची मुंबईतील ‘एन्ट्री’ महागली; पाच टोलनाक्यांवर मोजावी लागणार अधिकची रक्कम 

Tags

follow us