Download App

Nepal Earthquake : नेपाळमध्ये शक्तिशाली भूकंप! 129 जणांचा मृत्यू, भारतातही हादरे

Nepal Earthquake : जगभरात भूकंपाच्या घटना वाढल्या आहेत. भारताशेजारील देश नेपाळमध्ये (Nepal Earthquake) काल रात्री शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली. या विनाशकारी भूकंपाचा जोरदार फटका बसला आहे. या भूकंपात आतापर्यंत 129 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू तर दीडशे लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. रुकम पश्चिम भागात 36 तर जाजरकोटमध्ये 34 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रुकुम पश्चिमचे डीएसपी नानराज भट्टराई आणि जाजरकोटचे डीएसपी संतोष रोक्का यांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. तसेच मेपाळच्या पीएमओ कार्यालयानेही ट्विट करत या घटनेची माहिती दिली आहे.

या घटनेत सध्या मदतकार्य आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेपाळच्या उत्तर आणि पश्चिम जिल्ह्यांमध्ये भूकंपामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. नेपाळच्या पीएमओ कार्यालयाने या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. तसेच बचावपथके घटनास्थळी पाठविण्यात आल्याची माहिती दिली. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप मापन केंद्राच्या माहितीनुसार जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

या भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की काही कळायच्या आत मोठ्या इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. नागरिक भयभीत झाले. ज्यांना जमेल तसे जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळाले. या दुर्घटनेत मात्र अनेक जण इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. या लोकांना आता बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ढिगाऱ्यातून मृतदेहही बाहेर काढले जात आहेत. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

India-Canada वादानंतर भारतीयांनी फिरवली पाठ; नमलेले टुड्रो देणार 5 लाख नागरिकांना प्रवेश

भारतातही जमीन हादरली

नेपाळप्रमाणेच भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली एनसीआरसह उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भूकंप झाला. येथील नागरिक भीतीपोटी घराबाहेर पळाले. या भूकंपात मात्र कोणतेही नुकसान झाले नाही. दिल्ली एनसीआरमध्ये 60 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवत होते असे येथील नागरिकांनी सांगितले. भारतात याआधीही भूकंप झाला. मात्र या भुकंपात कुठेही नुकसान झाल्याची माहिती नाही. अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात दोन हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले होते. त्यानंतर आता नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात 129 जणांचा मृत्यू झाला आहे.

Earthquake : तैवानमध्ये शक्तिशाली भूकंप, नेपाळही हादरला!

नेपाळमध्ये वारंंवार भूकंपाचे धक्के

16 ऑक्टोबर रोजी नेपाळच्या सुदूरपश्चिम प्रांतात 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. ही घटना ताजी असतांनाच रविवारी पुन्हा एकदा नेपाळमध्ये 5.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (National Center for Seismology) याबाबतची माहिती दिली होती. दरम्यान, भारतातील बिहार राज्याच्या अनेक भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले होते. रविवारी सकाळी पाटणासह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार नेपाळची राजधानी काठमांडू येथे रविवारी रिश्टर स्केलवर 5.3 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. सकाळी 7:24 वाजता नेपाळच्या काही भागात या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. बागमती आणि गंडकी प्रांतातील इतर जिल्ह्यांमध्येही त्याचे धक्के जाणवले. या भूकंपाची खोली 10 किलोमीटर खाली होती.

 

Tags

follow us

वेब स्टोरीज