Nepal election: भारतातील शेजारी राष्ट्र आणि एकेकाळी सलोख्याचे संबंध असलेल्या नेपाळमध्ये (Nepal election) सत्तांतर झालाय. झेन झीच्या गळ्यातील ताईत बनलेले बालेंद्र उर्फ बालेन शाह (Balen Shah) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने (RSP) स्पष्ट बहुमत मिळवलंय. आरएसपीने तब्बल 100 जागा जिंकत सत्ता काबिज केलीय. विशेष म्हणजे बालेन शाह यांनी चारवेळा पंतप्रधान राहिलेले केपी शर्मा यांचा ( KP Sharma Oli) धुव्वा उडविला. बालेन यांना त्यांचा तब्बल 50 हजार मतांनी पराभव केलाय. या निवडणुकीत किंगमेकर ठरलेले बालेन शाह हे पंतप्रधान होणार आहे.
केपी शर्मा-ओलींचा दारुण पराभव
35 वर्षीय बालेंद्र शाह यांना झापा मतदारसंघात 68 हजार 348 मते मिळाली आहेत. तर केपी शर्मा ओली यांना अवघे 18,734 हजार मते मिळाली आहेत. नेपाळचा सर्वात जुना पक्ष सीएपए-यूएमएल पक्षाला लोकांनी नाकारली असून, या पक्षाचे अस्तित्व लयास गेलं आहे. राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने 129 पैकी शंभर जागा जिंकल्या आहेत. तर दुपारपर्यंत 25 जागांवर आघाडी आहे. तर नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने सर्व दहा जागा जिंकल्या आहेत. बालेन शाह हे अवघ्या 35 वर्षीय पंतप्रधान होतीय. नेपाळच्या संसदीय कारकीर्तीत सर्वात कमी वयाचे ते पंतप्रधान ठरतील. तसेच मधेशी समाजातील ते पहिले पंतप्रधान असणार आहे.
सत्तांतर का घडलं ?
मागील सरकारवर नेपाळची जनता खूप नाराज होती. भ्रष्टाचार, नातेवाइकांचे राजकारण, महागाईमुळे लोक मागील सरकारवर नाराज होते. ते मतपेटीतून स्पष्टपणे दिसले आहे. नेपाळी काँग्रेसला तीन, सीपीएन-यूएमएलला केवळ सात जागा मिळाल्या आहेत. नेपाळी कम्युनिस्ट पार्टी, श्रम शक्ती पार्टी, राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीला लोकांना दूर केलंय. तर चार वर्षांपूर्वी स्थ बालेन शाह यांची मधेशी संबंध आणि मैथिला भाषा त्यांना फायद्याची ठरल्याचे राजकीय तज्ञ सांगतात.
बालेन शाह लोकांच्या गळ्यातील ताईत ठरले?
नेपाळमधील सरकारवर लोकांचा रोष होता. तरुण वर्ग सरकारवर तीव्र नाराज होता. तरुणांनी सरकारविरोधात आंदोलने सुरू केली होती. हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकारने पोलिस बळाचा वापर सुरू केला होता. तसेच सोशल मीडियावर बंदी घातली होती. त्यामुळे तीव्र आंदोलने सुरू झाले होते. या आंदोलनादरम्यान बालेन शाह यांचा नेतृत्व पुढे आले होते. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 77 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर के. पी. ओली यांनी पंतप्रधानपद सोडले होते.
कोण आहेत बालेन शाह?
बालेन उर्फ बालेंद्र शाह यांचा जन्म 27 एप्रिल 1990 ला काठमांडू येथे झाला आहे. शाह मधेशी समाजातून येतात. जेन-झी आंदोलनानंतर बालेन यांचे नाव नेपाळमध्ये सर्वदूर पसरले. मधेशी समाज हक्कासाठी लढणारा समाज म्हणून ओळखला जातो. देशातील राजकीय, आर्थिक आणि प्रशासकीय सुधारांसाठी समाजाने लढे दिले आहेत. नेपाळमध्ये मधेशी आंदोलन गाजले होते. या आंदोलनाची हक्व आणि समानतेसाठी लढा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. त्यामुळे मधेशी समाजाचा पंतप्रधान होणे याला महत्व असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय मधेशी समाजाचे भारताबरोबर जवळचे संबंध आहेत. तर बालेन हे इंजिनिअर आहेत. रॅपर, कवी, म्युझिक प्रोड्यूसर, गीतकार म्हणून नेपाळमध्ये ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी 2022 मध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर ते काठमांडूचे महापौर झाले होते.
