Download App

New York flooding: न्यूयॉर्क पाण्याखाली ! आणीबाणीची परिस्थिती जाहीर

  • Written By: Last Updated:

न्यूयॉर्क : अमेरिकेलाही (America) पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. शुक्रवारी न्यूयॉर्क शहरात (New York City) मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. पहिल्यांदा या शहरात एेवढा पाऊस झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रस्ते, विमान वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अमेरिकेत जाऊन परराष्ट्र मंत्र्यांनी ट्रुडोंना सुनावले, ‘कॅनडा भारतविरोधी कारवायांचे केंद्र’

स्थानिक हवामान विभागाच्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी काही भागात दोन इंच पाऊस (5. 08 सेमी) पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर आणखी दोन इंच पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सकाळीच झालेल्या पावसामुळे न्यूयॉर्क शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे.

आणखी पावसाची शक्यता वर्तविल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाली आहे. पावसामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे खासगी वाहतूक ठप्प आहे. तर शहरातील सर्वच सबवे सेवाही रोखण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील विमानतळाचे एक टर्मिनल बंद करण्यात आले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवशी पदकांची लयलूट; नेमबाजीत 5 पदके, टेनिसमध्ये रौप्य

न्यूयॉर्कचे गव्हर्नर कॅथी होचूल यांनी नागरिकांसाठी एक आवाहन केले आहे. पावसाची परिस्थिती निर्माण लोकांनी घराबाहेर पडू नये. मोकळ्या जागेवर जाण्यापूर्वी सावधानता बाळगावे. तसेच गव्हर्नर यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याची सूचनाही दिलेली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे न्यूयॉर्कमध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्याचे एक अहवालात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत पावसामध्ये वाढ झाली आहे. एका अभ्यासानुसार अमेरिकेत 1958 ते 2012 या दरम्यान पावसामुळे 70 टक्के वाढ झाली आहे.

भयानक परिस्थितीचे व्हिडिओ व्हायरल
पावसाने तडाखा बसलेल्या न्यूयॉर्क शहरातील व्हिडिओ, फोटोज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेली आहे. त्यात सर्वंच रस्ते पाण्याखाली गेलेले आहे. तसेच वाहने पाण्यात बंद पडलेले आहे. सब वे बंद पडल्याने हजारो लोक स्टेशनवर अडकून पडले आहेत. न्यूयॉर्क या आधुनिक शहराची पावसामुळे बिकट परिस्थिती तयार झालेले आहे. लोक अनेक ठिकाणी अडकून पडलेले आहेत. त्यांना प्रशासनाकडून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्याचे कार्य सुरू आहे. त्यात आणखी पावसाचा इशारा दिलेला आहे.

Tags

follow us