Download App

सौदी अरेबियासह 6 राष्ट्रांचा BRICS मध्ये समावेश, विस्तारासोबत ‘हे’ नामकरणही झालं

  • Written By: Last Updated:

Expansion of BRICS : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत (BRICS) एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता ब्रिक्सचा विस्तार करण्यात येणार असून ब्रिक्समध्ये आणखी सहा देशांचा समावेश होणार आहे. BRICS मध्ये इराण, अर्जेंटिना, इथिओपिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया हे देश सहभागी होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांनी ही घोषणा केली.

पहिल्या ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा समावेश होता. त्या देशांच्या नावाच्या पहिल्या अक्षरांवरूनच या संघटनेचे नाव BRICS ठेवण्यात आलं होतं. पण आता आणखी सहा देशांची भर पडणार असल्यानं ब्रिक्स सदस्य देशांची संख्या अकरा होणार आहे. त्यामुळं आता या संघटनेचं नामकरण ब्रिक्स प्लस असं करण्यात आलं आहे.

यावेळी रामाफोसा म्हणाले की, ब्रिक्स विस्ताराच्या पहिल्या टप्प्यावर आमची सहमती झाली आहे. याशिवाय इतर टप्पेही यानंतर पार पडतील. सध्या आम्ही अर्जेंटिना, इजिप्त, इथियोपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांना BRICS चे पूर्ण सदस्य होण्यासाठी आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारीपासून हे देश संघटनेचे सदस्य होतील.

‘ब्रिक्सच्या विस्ताराला भारताचा नेहमीच पाठिंबा’
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही ब्रिक्सच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ब्रिक्सच्या विस्तारासाठी मार्गदर्शक तत्त्वे, निकष, कार्यपद्धती यावर आमच्या संघांचे एकत्रितपणे सहमती झाली, याचा याचा मला आनंद आहे. मला विश्वास आहे की, समूहातील नवीन सदस्य देशांसोबत काम करून आम्ही ब्रिक्सला नवीन गतिमानता देऊ शकू.

ब्रिक्सचा विस्तार करण्याच्या निर्णयामुळे बहुध्रुवीय जगामध्ये अनेक देशांचा विश्वास आणखी दृढ होईल. ब्रिक्सच्या विस्ताराला भारताने नेहमीच पूर्ण पाठिंबा दिला आहे. नवीन सदस्यांची भर पडल्याने गट आणखी मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

 

 

 

 

Tags

follow us