Download App

हज यात्रेकरुंच्या मृत्यूच सत्र सुरूच; आत्तापर्यंत तब्बल 1300 जणांचा अंत, इजिप्तकडून १६ ट्रॅव्हल एजन्सींचे परवाने रद्द

यावर्षी अनेक हज यात्रकरुंचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इस्लामिक पवित्र स्थळांवरील तापमान वाढलं असल्याने मृत्यू झाल्याचं बोललं जातय.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Haj Pilgrims Death : यावर्षी हज यात्रेदरम्यान सौदी अरेबियामध्ये तब्बल १३०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Hajj pilgrims) वाळवंटातील इस्लामिक पवित्र स्थळांवरील तापमान वाढलं असल्याचं सौदीतील अधिकाऱ्यांनी रविवारी जाहीर केलं आहे. (Hajj) दरम्यान, सौदीचे आरोग्य मंत्री फहद बिन अब्दुररहमान अल-जलाजेल यांनीही याबाबत माहिती दिली आहे.

 १६ ट्रॅव्हल एजन्सींचे परवाने रद्द  मराठ्यांनो सावध व्हा! भुजबळ दंगली घडवण्यासाठी लोकांना तयार करतायंत; जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप

यातील १३०१ मृत्यूंपैकी ८३ टक्के अनधिकृत यात्रेकरू होते. जे पवित्र शहर मक्का आणि आसपास हज विधी पार पाडण्यासाठी वाढत्या तापमानात लांब अंतर चालत होते. ९५ यात्रेकरूंवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत, त्यापैकी काहींना राजधानी रियाधमध्ये उपचारांसाठी विमानाने नेण्यात आलं होतं. त्याचबरोबर अनेक मृत यात्रेकरूंकडं ओळखीची कागदपत्रं नसल्याने ओळख प्रक्रियेला उशीर झाल्याचंही अल-जलाजेल यानी सांगितलं. यातील मृतांना ब्रेकडाउन न देता मक्का येथे पुरण्यात आलं असही ते म्हणाले.

 १६ ट्रॅव्हल एजन्सींचे परवाने रद्द

यामध्ये जे मृत झाले आहेत त्यांच्यामध्ये ६६० हून अधिक इजिप्शियन लोकांचा समावेश आहे. कैरोमधील दोन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यापैकी ३१ वगळता सर्व अनधिकृत यात्रेकरू होते. इजिप्तने १६ ट्रॅव्हल एजन्सींचे परवाने रद्द केले आहेत, ज्यांनी अनधिकृत यात्रेकरूंना सौदी अरेबियाला जाण्यास मदत केली. याची दखल घेत सर्वांचे परवाने आता रद्द करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसंच, बहुतेक मृतांची नोंद मक्काच्या अल-मुईसेम परिसरातील इमर्जन्सी कॉम्प्लेक्समध्ये झाली असल्याचही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

सर्वाधिक मृत्यू चेंगराचेंगरीमुळे वसुंधरा राजेंच्या वक्तव्याची देशभर चर्चा; म्हणाल्या, जे बोट धरून मोठे झाले, चालायला शिकले, तेच बोट…

हजमध्ये सातत्याने मृत्यू होत आले आहेत. २ दशलक्षाहून अधिक लोक पाच दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी सौदी अरेबियाला जातात. या यात्रेदरम्यान अनेकदा चेंगराचेंगरी होते. तर अनेकदा साथीचे आजारही पसरले आहेत. २०१५ मध्ये, मीना येथे झालेल्या चेंगराचेंगरीत २४०० हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. ही चेंगराचेंगरी आतापर्यंतची सर्वाधिक प्राणघातक होती. तर त्याच वर्षाच्या सुरुवातीला मक्काच्या ग्रँड मशिदीत एक वेगळी क्रेन कोसळून १११ जणांचा मृत्यू झाला होता.

follow us

वेब स्टोरीज