Download App

पहलगाम दहशतवादी हल्ला, पाकिस्तानला धक्का, भारतासोबत आले ‘हे’ मुस्लिम देश

Pahalgam Terrorists Attack : मंगळवारी दुपारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terrorists Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात

  • Written By: Last Updated:

Pahalgam Terrorists Attack : मंगळवारी दुपारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terrorists Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी देखील झाले आहे. पाकिस्तानस्थित बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबाचा सहयोगी असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याने या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे या हल्ल्यामागे कुठलाही संबंध नसल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. तर आता अमेरिका, रशिया आणि चीनसह जगभरातील अनेक मुस्लिम देशांनी देखील या भ्याड हल्ल्याचा निषेध करत भारतासोबत ठामपणे उभे असल्याचे म्हटले आहे. आम्ही हिंसाचार, अतिरेकीपणा आणि नागरिकांना टार्गेट करण्याच्या सर्व भ्याड कृत्यांना नकार देतो आणि भारतासोबत ठामपणे उभे आहोत.

सौदी अरेबिया शोकग्रस्त कुटुंबे आणि भारत सरकारप्रती मनापासून संवेदना आणि सहानुभूती व्यक्त करतो. असं सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. तर दुसरीकडे कुवेतचे क्राउन प्रिन्स सबा खालेद अल-हमद अल-सबाह यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना “पहलगाममधील पर्यटकांना टार्गेट करून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात झालेल्या दुःखद मृत्यूबद्दल” शोक व्यक्त केला.

तर संयुक्त अरब अमिराती (यूएई) च्या परराष्ट्र मंत्रालयानेही मंगळवारी एका निवेदनात या हल्ल्याचा “तीव्र निषेध” केला. “यूएई या गुन्हेगारी कृत्यांचा तीव्र निषेध करतो आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करून सुरक्षा आणि स्थिरता बिघडवण्याच्या उद्देशाने सर्व प्रकारच्या हिंसाचार आणि दहशतवादाला कायमचा नकार देतो,” असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

दुसरीकडे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, या हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही. ते म्हणाले, “हे सर्व त्यांच्याच घरात सुरू झाले आहे. तथाकथित राज्यांमध्ये भारताविरुद्ध क्रांती सुरू आहे. एक-दोन नाही तर डझनभर सुरू आहेत. हे नागालँडपासून काश्मीर, छत्तीसगड, मणिपूरपर्यंत घडत आहे. या सर्व ठिकाणी भारत सरकारविरुद्ध क्रांती होत आहे.” असं पाकिस्तानकडून सांगण्यात येत आहे.

Video : TRP साठी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न, काश्मिरी तरुणांचा मीडियाविरोधात आंदोलन

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक सुरु असून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सरकार काही मोठे पाऊल उचलणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सीसीएस बैठकीपूर्वी सुमारे अडीच तास तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली.

follow us