Manoj Jarange Patil press conference : छगन भुजबळांना मराठ्यांसोबत दंगल घडवून आणायची आहे असा थेट आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. परंतु, मराठ्यांना माझं आवाहन आहे सावध राहा. (Manoj Jarange Patil ) जर अस काही घडलं तर आमचा न विलाज आहे. आम्हाला जशास तस उत्तत द्यावचं लागेल. (Chhagan Bhujbal ) मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे याची आपण दखलं घेतली पाहिजे असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले आहेत. भुजबळ दंगली घडवण्यासाठी लोकांना तयार करत असतील तर आमचा न विलाज आहे राज्यातील प्रत्येक मराठा जशाच तसंच उत्तर देणार असा स्पष्ट इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आम्ही क्षत्रिय आहोत कधीतरी जातीसाठी बोला, तुमच्यामुळे जात मरेल शहाणे व्हा; जरांगेंचं विखेंना जोरदार प्रत्युत्तर
छगन भुजबळ यांनी मराठ्यांच्या विरोधात बोलणारी माणसं पेरली आहेत. त्यांना दंगल घडवायची आहे. भुजबळांच्या पुण्याच्या भाषणातून अनेक अर्थ निघत आहेत. ते लोकांना सरळ-सरळ चिथावणी देत आहेत. लोकांना दंगलीसाठी तयार करत आहेत असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. परंतु, तसा प्रयत्न झाला तर आपण तयार राहावं. तसा प्रयोग झाला तर आम्ही एकही पाऊल मागं हटणार नाही. जशास तसं उत्तर देऊ. माझं गृहमंत्र्यांना सांगणं आहे, या गोष्टींकडे गांभीर्याने पाहा. भुजबळ इशारे देत असेल तर राज्यासाठी गंभीर बाब आहे. आम्ही क्षत्रिय आहोत. कडवट मराठे आहोत. उत्तराला उत्तर देणारच, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
समाजाची नाराजी ओढवून घेऊ नका
यावेळी जरांगे पाटील यांनी मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावरूनही भुजबळांवर जोरदार टीका केली. भुजबळांना अभ्यास नाही. मी काय म्हटलंय ते सांगा. आम्ही जे सांगतो ते लोकं ऐकतील असं तुम्हाला वाटतं. तुम्ही सांगितलेलं लोकं ऐकणार नाही. मी सांगितलेलंच लोकं ऐकतील. पाशा पटेल मला महिन्याभरापूर्वी भेटले. ते म्हणाले, तुमच्यामुळे मी कुणबी झालो. माझी नोंद सापडली. मराठे ओबीसीत आहेत हे मान्य करा. या वयात तुम्ही समाजाची नाराजी ओढवून घेऊ नका. मुस्लिम समाज ओबीसीत आहे. तो आरक्षणात येणार आहे. त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, असंही ते म्हणाले.
14 तारखेला काय करायचं ते पाहू हाकेंच्या आंदोलनामागे भुजबळ, जातीय दंगली झाल्या तर तेच जबाबदार जरांगेंचे टीकास्त्र
मंत्री शंभुराज देसाई यांनी दोन्ही समाजाच्या नेत्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. 13 तारखेपर्यंत शांत राहा, असं त्यांनी म्हटलंय. त्यावरही जरांगे पाटील बोलले आहेत. मी शंभुराज देसाई यांच्या शब्दांचा मान राखतो. ते म्हणतात म्हणून मी 13 तारखेपर्यंत प्रतिक्रिया देणार नाही. बोलणार नाही. ही माझी शेवटची प्रतिक्रिया आहे. 13 तारखेला आमच्या बाजूने न्याय होईल याची आम्हाला अपेक्षा आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. तसंच, आमच्या 9 मागण्या मान्य होतील ही अपेक्षा ठेवू. 13 तारखेपर्यंत काही उत्तर देऊ नका. आपल्याला मारहाण केली तरी उत्तर देऊ नका. 14 तारखेला काय करायचं ते पाहू, असं सूचक विधान त्यांनी यावेळी केलं आहे.