Download App

पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके आम्हाला आरक्षण मिळूद्या; चिठ्ठी लिहित मराठा आंदोलकाने केली आत्महत्या

आत्महत्येचं सत्र काही कमी झालेलं नाही. आज मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

  • Written By: Last Updated:

Maratha Reservation Youth Commits Suicide : मराठा आरक्षणाचा प्रश्न सुमारे गेली एक वर्षापासून धुमसतो आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे या मागणीसाठी आंदोलन केल्यानंतर हा प्रश्न अधिकचा पेटला आहे. (Maratha Reservation) दरम्यान, आरक्षण मिळावं म्हणत काही तरुणांनी आत्महत्याही केल्या आहेत. (Youth suicide) आज अशीच घटना बार्शी येथून समोर आली आहे. येथील तरुणाने मराठा आरक्षणाची मागणी करत आपलं जीवन संपवलं आहे.

कामासाठी पुण्याला  मोठी बातमी : हाकेंची प्रकृती चिंताजनक; रक्तदाब वाढल्याने ब्रेन हॅमरेजची डॉक्टरांनी व्यक्त केली भीती

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणाचं प्रसाद देठे असं नाव असून तो बार्शीतला रहिवाशी होता. प्रसाद याने आत्महत्या करण्यापूर्वी एका चिठ्ठीवर भावनिक संदेश लिहून ठेवला आहे. प्रसाद हा बार्शीचा रहिवाशी असला तरी कामासाठी म्हणून तो पुण्याला गेला होते. तेथे तो एका खासगी कंपनीत काम करत होता.

प्रसादने संदेशात काय म्हटलय?

जयोस्तु मराठा
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे.
जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट रहा.
मला माफ करा.
तुमचाच प्रसाद
असा संदेश लिहीत प्रसादने आत्महत्या केली आहे.

जरांगेंना होता पाठिंबा तापमानाचा भीषण प्रकोप! उष्माघाताने 550 पेक्षा अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू, अनेकांवर उपचार सुरु

सुसाईड नोट लिहून प्रसाद देठे यांनी आयुष्य संपवलं. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु झाल्यानंतर प्रसाद देठे हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय होते. ते सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सातत्याने पोस्ट टाकायचे. त्यांनी अनेकदा फेसबुक लाईव्ह करुन मराठा आरक्षणाची भूमिका हिरीरिने मांडली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. जरांगे पाटील जिंदाबाद लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

follow us