Hajj Pilgrims : जगभरात मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेलं आहे. (Hajj) या उष्णतेच्या मोठ्या लाटेत भारतात अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये मृत्यूची संख्या 65 च्या वर गेली. (temperature) आखाती देश सौदी अरेबियाची अवस्था तर आणखीनच बिकट, आधीच सौदी अरेबियातील उष्णता प्राणघातक आहे.
यावेळी सर्व विक्रम मोडीत काढत तापमानाने 50 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, मोठ्या उष्णतेमुळे सुमारे 550 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचं आज मंगळवारी सौदी सरकारने सांगितलं आहे.
मृत हज यात्रेकरूंमध्ये सर्वाधिक 323 इजिप्तमधील यात्रेकरूंचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी एएफपीला सांगितलं. मृत हज यात्रेकरूंमध्ये अनेक देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. जॉर्डनमधील सुमारे 60 हज यात्रेकरूंचा देखील मृत्यू झाला आहे.
गेल्या वर्षी, हज दरम्यान, सुमारे 240 यात्रेकरू उष्णतेमुळे मरण पावल आहेत. बहुतेक इंडोनेशियन होते. सौदी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेमुळे आजारी पडलेल्या सुमारे दोन हजार हज यात्रेकरूंवर उपचार सुरू आहेत.