काळजी घ्या! उन्हाचा पारा चढला… राज्यात उष्माघाताचा पहिला बळी, 25 तरूणाचा मृत्यू

One person dies of heatstroke in Soygaon : राज्यात होळी संपताच उन्हाचा पारा चढला आहे. वाढत्या उन्हाच्या झळांनी संपूर्ण महाराष्ट्र तापतोय. अंगाची लाही लाही होतेय. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आलीय. सोयगाव (Soygaon) तालुक्यामध्ये उष्माघाताने (heatstroke) पहिला बळी गेलाय. दुसरीकडे धरणातील जलसाठा कमी होतोय. राज्यातील धरणांमध्ये 49 टक्के पाणीसाठा (Temperature Update) शिल्लक आहे. तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे, बाहेर फिरताना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याने केलंय.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एप्रिल महिना सुरू होण्याआधीच तापमान वाढत आहे. सोयगाव तालुक्यामध्ये काल 26 मार्ज रोजी 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय. या तापमानामुळे सोयगाव (Maharashtra Temperature Update) तालुक्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. निमखेडी बस थांब्यावर ही घटना घडलेली आहे. उन्हामध्ये बस थांब्यात सदर व्यक्ती विसावा घेत होता. उष्माघाताने त्याचा मृत्यू झालाय. अमोल दादरकर असं या तरूणाचं वय असून तो 25 वर्षाचा होता.
Video : देशमुख हत्या प्रकरण; वाल्मिक कराड सागंल ते घुलेनी.. कोर्टात काय घडलं? निकम काय म्हणाले?
याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलीय. राज्यात तापमानात मोठी वाढ होतेय. अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा 42 अंशांच्या पुढे गेलाय. त्यामुळे पाण्याची गरज वाढली (Maharashtra Weather Update) आहे. तापमान वाढल्यामुळे राज्यांतील धरणांमधील पाणीसाठा देखील कमी होत आहे. राज्यातील सर्व धरणांत मिळून केवळ 49 टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मार्च अखेरीस ही परिस्थिती आहे, त्यामुळे पुढील काळात चिंता वाढणार असल्याचं दिसतंय.
निसर्गरम्य सिक्कीममध्ये उलगडणार तीन मित्रांची कहाणी, ‘बंजारा’चा टीझर प्रदर्शित
तर राज्यातील बहुतांश गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करणे, सुरू झालंय. तर दुसरीकडे धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होतोय. नागपूर विभागामध्ये सहा जिल्ह्यातील धरणांमध्ये 46 टक्के तर अमरावती विभागात 55 टक्के, पुणे विभागात 47 टक्के, नाशिक विभागामध्ये 49 टक्के , कोकण विभागात 55 टक्के, तर मराठवाड्यातील धरणांमध्ये सध्या 47 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.