Download App

वसुंधरा राजेंच्या वक्तव्याची देशभर चर्चा; म्हणाल्या, जे बोट धरून मोठे झाले, चालायला शिकले, तेच बोट…

भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष वसुंधरा राजे सिंधीया यांच वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्यांचा रोख नक्की कोणाकडे आहे याबबत चर्चा रंगली आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Former CM Vasundhara Raje Scindia : भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांच्या वक्तव्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजस्थानसह देशाच्या राजकारणात बरीच चर्चा होत आहे. (NEET Exam) उदयपूरमधील सुंदर सिंह भंडारी चॅरिटेबल ट्रस्टने जनसन्मान सोहळा आयोजित केला होता, त्यामध्ये वसुंधरा राजे बोलत होत्या.

वक्तव्याचा रोख कुणाकडं? Parliament special session : म्हणून 18 अंक आहे खास; 18 व्या लोकसभेनिमित्त पंतप्रधान मोदींनी सांगितलं महत्त्व

वसुंधरा राजे म्हणाल्या, सुंदर सिंह भंडारी यांनी एकेक माणसाला निवडून भाजपात आणलं. त्यांनी या भागात एका छोट्याशा रोपट्याचं मोठ्या वटवृक्षात रुपांतर केलं. या भागात आपली संघटना मजबूत केली, कार्यकर्त्यांना मोठं केलं. पक्ष, संघटना मोठी करत असताना त्यांच्यामुळे कार्यकर्तेही मोठे झाले. त्यांनी राजस्थानमध्ये भैरेसिंह शेखावत यांच्यासह इतर अनेक नेत्यांना पुढे आणलं. (NEET) मात्र, निष्ठेचा तो काळ वेगळा होता, त्याकाळी कोणी काय केलंय यावर लोकांचा विश्वास असायचा. हल्लीचे लोक जे बोट धरून मोठे झाले, चालायला शिकले, तेच बोट कापण्याचा प्रयत्न करतात. वसुंधरा राजे यांच्या या वक्तव्याचा रोख कुणाकडे आहे याची जोरदार चर्चा रंगली आहे.

गुलाबचंद कटारिया उपस्थित

वसुंधरा राजे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे याबाबत लोक तर्कवितर्क लावत आहेत. अलीकडच्या काळात वसुंधरा राजे आणि भाजपाच्या दिल्लीमधील नेतृत्वामधला संघर्ष वाढला आहे. राजस्थानची विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात हा संघर्ष टोकाला पोहोचला होता. दरम्यान, वसुंधरा राजे त्यांच्या मनातली खदखद व्यक्त करू लागल्या आहेत. या कार्यक्रमाला आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपद नाकारल्याने संघर्ष प्रज्ज्वल पाठोपाठ भाऊ सूरज रेवण्णालाही अटक; लैंगिक शोषणाच्या प्रकरणात कारवाई

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपादरम्यान वसुंधरा राजे आणि गुलाबचंद कटारिया यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाल्याचं वृत्त माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. तसंच, निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेच्या वेळी पक्षश्रेष्ठींनी वसंधुरा राजेंकडे सपशेल दुर्लक्ष केलं. वसुंधरा राजे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं बोललं जात होतं. मात्र, पक्षाने भजनलाल शर्मा यांना राज्याच्या प्रमुख पदावर बसवलं. या सगळ्या घडामोडींमुळे भाजपा पक्षनेतृत्व आणि वसुंधरा राजेंमध्ये संघर्ष सुरू झाल्याचं बोललं जात आहे.

follow us

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज