प्रज्ज्वल पाठोपाठ भाऊ सूरज रेवण्णालाही अटक; लैंगिक शोषणाच्या प्रकरणात कारवाई
Prajwal Revanna’s brother Suraj Revanna Arrested : कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणात पुरत्या (Karnaraka News) फसलेल्या रेवण्णा कुटुंबियांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. प्रज्ज्वल रेवण्णानंतर त्याचा भाऊ सूरज रेवण्णालाही पोलिसांनी (Suraj Revanna) अटक केली आहे. सूरजवर जेडीएस कार्यकर्त्यावर अनैसर्गिक लैंगिक संबंधांचा आरोप ठेवण्यात आला आहे. कर्नाटक पोलिसांनी शनिवारी (Karnataka Police) जेडीएस एमएलसी सूरज रेवण्णा विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या अटकेमुळे कर्नाटकचं राजकारण पुन्हा ढवळून निघालं आहे.
तक्रार देणाऱ्याने असा दावा केला आहे की नोकरीचे अमिष दाखवून प्रज्ज्वलचा भाऊ सूरजने त्याला एका ठिकाणी बोलावले. याठिकाणी त्याचे कपडे काढून लैंगिक अत्याचार करण्यात आला. ओठ आणि गळ्याचा चावा घेतला. यानंतर तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी लागलीच एफआयआर दाखल करून सूरजला अटक केली. दुसरीकडे सूरज रेवण्णा आणि त्याच्या सहकाऱ्याने असा आरोप केला आहे की त्या व्यक्तीने पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. नंतर दोन कोटी रुपयांत तडजोड करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी सूरज आणि त्याच्या सहकाऱ्यालाही आरोपी केलं आहे.
Karnataka : कर्नाटकात राडा! ‘इंग्रजी’ फलकांची तोडफोड; 60 टक्के कन्नडच्या आदेशाचा वाद पेटला
तक्रारीत पुढं म्हटले आहे की मी या घटनेची माहिती सूरज रेवण्णाच्या सहकाऱ्याला दिली आणि न्यायासाठी लढणार असल्याचंही सांगितलं. त्यानंतर सूरजच्या सहकाऱ्याने दोन कोटी रुपये देतो असं सांगितलं. माझ्या जीवाला धोका होता. त्यामुळे मी बंगळुरू गाठलं. याबाबत पुरावे देण्यासही मी तयार आहे. दुसरीकडे सूरजच्या सहकाऱ्याने सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. वसुली करण्यासाठी त्यांच्याकडून पाच कोटी रुपये मागितले जात होते. नंतर दोन कोटी रुपयांत तडजोड झाली.
सूरज रेवण्णाच्या सहकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी संबंधित तक्रारकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सूरज आणि प्रज्ज्वल रेवण्णा जेडीएस आमदार एचडी रेवण्णा आणि भवानी रेवण्णा यांची मुलं आहेत. एचडी रेवण्णा आणि त्यांची पत्नी भवानी रेवण्णा यांच्यावरही अत्याचार पीडितांपैकी एकाच्या अपहरणाचा आरोप आहे. जेडीएसचा माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला लैंगिक अत्याचाराच्या तीन प्रकणात अटक करण्यात आली आहे.
Prajwal Revanna : JDS कोंडीत! ‘त्या’ प्रकारानंतर देवेगौडांच्या नातवाची पक्षातून हकालपट्टी