Karnataka : कर्नाटकात राडा! ‘इंग्रजी’ फलकांची तोडफोड; ’60 टक्के कन्नड’च्या आदेशाचा वाद पेटला

Karnataka : कर्नाटकात राडा! ‘इंग्रजी’ फलकांची तोडफोड; ’60 टक्के कन्नड’च्या आदेशाचा वाद पेटला

Karnataka News : दक्षिण भारतात भाषेवरून होणारी आंदोलनं नवीन नाहीत. आताही कर्नाटकात (Karnataka) भाषेवरून जोरदार राडा झाला आहे. कन्नड भाषा समर्थकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली आणि दुकानांवरील इंग्रजी भाषेतील फलकांची तोडफोड केली. हा वाद भडकण्याचं कारण म्हणजे कर्नाटकातील सर्व प्रतिष्ठानांच्या साईन बोर्डावर 60 टक्के कन्नड भाषा असावी, असे आदेश देण्यात आले होते.

आज राजधानी बंगळुरू शहरात अनेक ठिकाणी प्रदर्शने झाली. आंदोलकांनी अनेक दुकानांना निशाण्यावर घेतले. या आंदोलनांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असून यामध्ये आंदोलक इंग्रजी भाषेचे फलक फाडताना दिसत आहेत. काही जणांनी फलकांना काळेही फासले.

Karnataka : CM सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात? ‘त्या’ गुप्त बैठकीनंतर DK थेट दिल्लीला रवाना

आंदोलकांनी मागणी केली होती की या आदेशाची तत्काळ पालन केले जावे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंगळुरू महापालिकेचे प्रमुख तुषार गिरी नाथ यांनी सांगितले की महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येणारी सर्व दुकाने आणि मोठ्या संस्थांना 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत जर आदेशाचे पालन संबंधितांनी केले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यांचे लायसन्सही रद्द केले जाऊ शकते.

तसं पाहिलं तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) सुद्धा वारंवार कन्नड भाषेचा वापर करण्याचे सांगत असतात. याआधीच्या त्यांच्या मु्ख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात बंगळुरू मेट्रो स्टेशन येथील हिंदी भाषेतील नावांना टेप लावण्यात आले होते. याआधी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी सांगितले होते की राज्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने कन्नड भाषा शिकली पाहिजे. आपण सगळे कन्नडिग आहोत. येथे विविध भाषा बोलणारेही लोक राहतात.

Karnataka Politics : काँग्रेसचं सरकार पडणार, 50 आमदार भाजपाच्या संपर्कात; माजी मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

follow us
  • fb
  • instagram
  • youtube