Download App

Pakistan : इम्रान खानच्या अटकेनंतर झालेल्या हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू

Pakistan : माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan)यांच्या अटकेनंतर दुसऱ्या दिवशीही पाकिस्तानमध्ये (Pakistan)हिंसाचार सुरुच आहे. पेशावर(Peshawar), इस्लामाबाद(Islamabad), लाहोर(Lahore), कराची (Karachi) आणि रावळपिंडीसह (Rawalpindi)अनेक शहरांमध्ये खान यांच्या पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) च्या समर्थकांकडून जाळपोळ आणि तोडफोड सुरु आहे. तर 8 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. पंजाब प्रांतात लष्कर तैनात करण्यात आले आहे.

Shinde VS Thackery : …तर उद्धव ठाकरे पुन्हा मुखमंत्री होणार, घटनातज्ज्ञांनी स्पष्टच सांगितले

इम्रान खानला नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (NAB) 60 अब्ज पाकिस्तानी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलीस मुख्यालयातील तात्पुरत्या न्यायालयात विशेष NAB न्यायाधीशासमोर खानचा खटला सुरु आहे. यावर लवकरच निर्णय होऊ शकतो. NAB ने 14 दिवसांची कोठडी मागितली आहे.

इस्लामाबादमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. परदेशी दूतावास आणि वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पाकिस्तानच्या टीव्ही चॅनल ‘दुनिया न्यूज’नुसार, संपूर्ण देशातील इंटरनेट बंद करण्यात आले आहे. चांग भागातील आण्विक केंद्रावर लष्कराचे उत्तम कमांडो तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, इम्रानला अटक केल्यानंतर त्याचे दोन फोटो व्हायरल होत आहेत.

पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री उशीरा रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयाची तोडफोड केली. लाहोरमध्ये गव्हर्नर हाऊस आणि आर्मी कमांडरचे घर जाळण्यात आले. अनेक लष्करी अधिकाऱ्यांच्या घरांवर हल्ले झाले.

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’च्या माहितीनुसार, हिंसाचार पाहता संपूर्ण पाकिस्तानमधील इंटरनेट बंद करण्यात आले आहे. सर्व शाळा, महाविद्यालये दोन दिवस बंद आहेत. महत्त्वाच्या शहरांमध्ये निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात न आल्यास सैन्य रस्त्यावर आणले जाऊ शकते. इस्लामाबाद, पंजाब प्रांत आणि पेशावरमध्ये कलम 144 लागू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Tags

follow us