Shinde VS Thackery : …तर उद्धव ठाकरे पुन्हा मुखमंत्री होणार, घटनातज्ज्ञांनी स्पष्टच सांगितले

Shinde VS Thackery : …तर उद्धव ठाकरे पुन्हा मुखमंत्री होणार, घटनातज्ज्ञांनी स्पष्टच सांगितले

SC result on Maharashtra Political crises : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांचा निकाल अंतिम टप्प्यात आला आहे. हा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अपात्र होणार का? शिंदेंचं मुख्यमंत्री पद जाणार का? मग कोण मुख्यमंत्री होणार अशा एक ना अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.

सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल १४ मे पर्यंत येण्याची शक्यता आहे. दरम्यान सर्वच पक्षांकडून मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र झाली आहे. विविध नेत्यांची विधान आणि या स्पर्धेचतील नाव समोर येत आहेत. या दरम्यान आता घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी देखील एक महत्त्वाचा दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तर्कवित्रकांना उधान आले आहे.

उद्धव ठाकरेंनी खरंच राजीनामा दिला का? राज्यपाल भवनातून धक्कादायक माहिती समोर

उल्हास बापट यांनी केलेल्या दाव्यानुसार आता बहुमतासाठी सत्र बोलावलं होत. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे न्यायालयाने हे रद्द केलं तर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतात. याला ‘स्टेटस को अॅंटी’ काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने तसं केलेलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे बाहेर पडलेले पहिले सोळा आमदार घटनेनुसार अपात्र ठरतील कारण पक्षातून बाहेर पडताना तुमचं संख्याबळ हे दोन तृतीयांश हवं किंवा तुम्ही दुसऱ्या पक्षात विलीन व्हाव लागत. तर त्यांचं सदस्यत्व वाचत.

Maharashtra Politics : निश्चिंत राहा! आम्ही सर्व कायदेशीर केलंय; काही तासातचं…

त्याचबरोबर बापट पुढे सांगतात, की या सोळा लोकांमध्ये शिंदे आहेत ते अपात्र ठरले तर त्यांना मुख्यमंत्री राहता येणार नाही आणि मुख्यमंत्री गेले तर सरकार पडत. तर राज्यात सध्या कुणाकडे बहुमत नाही त्यामुळे राष्ट्रपती राजवट देखील येऊ शकते आणि राष्ट्रपती राजवट आली तर सहा महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात. असं देखील ते सांगतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube