पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, रुग्णालयावर टाकले बॉम्ब; 400 ठार

Pakistan Airstrikes On Afghanistan : सीमावादावरून गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पाकिस्तान - अफगाणिस्तान युद्धातून एक मोठी अपडेट

Pakistan Airstrikes On Afghanistan

Pakistan Airstrikes On Afghanistan

Pakistan Airstrikes On Afghanistan : सीमावादावरून गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पाकिस्तान – अफगाणिस्तान युद्धातून एक मोठी अपडेट समोर येत आहे. या अपडेटनुसार, पाकिस्तानने अफगाणिस्तानवर मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात 400 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला 250  पेक्षा जास्त नागरिक जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानने एका रुग्णालयावर बॉम्ब टाकले असल्याचा दावा अफगाणिस्तानकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे काबुलमधील विविध लष्करी तळांना टार्गेट करण्यात आले असल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.

‘टोलो न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या या हल्ल्यांमध्ये 400  हून अधिक लोकांचा (Pakistan Airstrikes On Afghanistan) मृत्यू झाला आहे. ज्या रुग्णालयाला कथितरित्या टार्गेट करण्यात आले, ते अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेने ग्रस्त असलेल्या व्यक्तींवर उपचार (Kabul Hospital) करण्याचे केंद्र होते. तर दुसरीकडे पाकिस्तानने तालिबानने केलेले हे आरोप फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानचा असा दावा आहे की, त्यांनी पूर्व अफगाणिस्तानमधील कोणत्याही नागरी ठिकाणाला टार्गेट केले नाही.

पाकिस्तानने आरोप फेटाळले

तालिबान सरकारचे (Taliban Government) प्रवक्ते झबीउल्ला मुजाहिद यांनी स्थानिक वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश लोक रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण होते. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांचे प्रवक्ते मुशर्रफ झैदी यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले. त्यांनी ठामपणे सांगितले की, काबुलमधील कोणत्याही रुग्णालयाला टार्गेट करण्यात आले नाही.

एका पोस्टमध्ये, पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयाने नमूद केले की, त्यांच्या लष्कराने केलेले हवाई हल्ले हे केवळ लष्करी तळांवर आणि दहशतवादी कारवायांना मदत करणाऱ्या पायाभूत सुविधांवर अत्यंत अचूकपणे केंद्रित होते. त्यांनी पुढे सांगितले की, अफगाण तालिबानशी संबंधित तांत्रिक उपकरणे आणि दारूगोळा साठवलेली गोदामे (डेपो) हे देखील या टार्गेटमध्ये समाविष्ट होते.

‘या’ राशींच्या लोकांना होणार आर्थिक नुकसान; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार

Exit mobile version