India Pakistan War : पाकिस्ताने भारतात हल्ले केल्यानंतर भारतीय सैन्याने थेट पाकिस्तानात (India Pakistan War) घुसून जोरदार हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. लाहोर, कराची, सियालकोटसह राजधानी इस्लामाबाद शहरात तुफान हल्ले सुरू केले आहेत. आताच हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावर मोठा स्फोट झाला आहे. याआधी भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त करुन टाकली. मिसाइल्सही नष्ट केल्या. आतापर्यंत पाकिस्तानच्या 50 मिसाइल्स नष्ट करण्यात आल्या आहेत.
पाकिस्तानने भारतावर हल्ले केल्यानंतर भारताने दमदार काउंटर अटॅक सुरू केला आहे. लाहोर, कराची शहरांवर तुफान हल्ले सुरू केले आहेत. तसेच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरू केला आहे. देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मुंबईतील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. राजधानी दिल्लीतील सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
LIVE : भारत सरकारचा आदेश.. तब्बल आठ हजार पाकिस्तानी ट्विटर अकाउंट बंद
पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताची एस 400 सिस्टीम पूर्ण अॅक्टिव्ह झाली आहे. पाकिस्तानचे अनेक ड्रोन्स हवेतच नष्ट करण्यात आले आहेत. जम्मूत नेमके किती ड्रोन आले याची नेमकी माहिती अजून समोर आलेली नाही.
भारतीय सैन्याच्या एअर डिफेन्स युनिट्सने पाकिस्तानचे एफ 16 फायटर जेट पाडले. ही कारवाई एलओसी जवळ झाली. पाकिस्तानी फायटर जेट भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी या विमानाला हाणून पाडण्यात आले. भारताने पाकिस्तानची एकूण तीन विमाने पाडल्याची माहिती समोर येत आहे. यात एक एफ 16 आणि दोन जेएफ 17 विमानांचा समावेश आहे.
याआधी पाकिस्तानाने भारतात अनेक ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला होता. परंतु, भारताच्या एस 400 डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे मनसूबे हाणून पाडले. भारताने एक एफ 16 आणि दोन जेएफ 17 फायटर जेट यांच्याव्यतिरिक्त 8 मिसाइल् आणि 16 ड्रोन्स नष्ट करण्यात आले आहेत.
जैसलमेर, पठाणकोट, होशियापूरवर पाकिस्तानचा हल्ला; पाकिस्तानची एफ 16, जेएफ 17 विमाने पाडली