Pakistan News : आर्थिक संकटाला तोंड देत असलेल्या पाकिस्तानात लवकरच (Pakistan Elections) निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच पाकिस्तानात महागाईने हाहाकार (Pakistan Inflation) उडाला आहे. आताही पुन्हा एकदा इंधनाच्या दरात (Fuel Price) वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यातच सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक झटका बसला आहे. या नव्या निर्णयानुसार पेट्रोलच्या किंमतीत प्रति लीटर 13.55 रुपये वाढ झाल आहे. आता पाकिस्तानात एक लीटर पेट्रोलची किंमत 272.89 रुपये झाली आहे. हाय स्पीड डिझेलच्या किंमती सुद्धा वाढल्या आहेत. डिझेलच्या किंमतीत प्रति लीटर 2.75 रुपये वाढ झाली आहे. आता पाकिस्तानात डिझेल 278.96 रुपये प्रति लीटर या दराने मिळत आहे.
पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ: इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा, माजी परराष्ट्रमंत्र्यांनाही शिक्षा
आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या किंमती पाहता इंधनाच्या किंमतीत वाढ होईल असा अंदाज आधीच व्यक्त केला जात होता मात्र ही वाढ इतकी जास्त असेल याचा अंदाज मात्र कुणालाच नव्हता. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 5 ते 9 रुपये वाढ होईल असे सांगण्यात येत होते. पाकिस्तानच्या वित्त विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत लाईट डिझेल ऑईल आणि केरोसीनच्या किंमतीबाबत काहीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे या दरात वाढ होणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
अलीकडच्या काळात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया मजबूत झाला आहे. परंतु, त्याचा फायदा देशातील नागरिकांना होताना दिसत नाही. चलन मजबूत झाले तरीही पाकिस्तानला इंधन आयात शुल्क जास्तच द्यावे लागले. पहिल्या सहामाहीत पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत 0.25 वर पोहोचला आहे. म्हणजेच पाकिस्तानमध्ये एका डॉलरची किंमत 280 रुपये झाली आहे. याआधी एका डॉलरची किंमत 281 पाकिस्तानी रुपये इतकी होती.
पाकिस्तानात घमासान! ‘बलूच आर्मी’चा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला; 10 ठार, 2 शहरांवर कब्जा
मागील वर्षात पेट्रोल 300 पार
याआधी सप्टेंबर 2023 मध्ये पाकिस्तानी अर्थमंत्रालयाने याबाबत एक ट्विट केले होते. पेट्रोलची किंमत 305.36 रुपये प्रति लिटर आणि एचएसडी 311.84 रुपये झाल्याचे त्यात म्हटले होते. केरोसीनच्या दरात कोणताही बदल केलेला नाही असे या ट्विटमध्ये म्हटले होते. स्थानिक वृत्तानुसार, पाकिस्तानात पेट्रोलची किंमत 290.45 रुपयांवरून 305.36 रुपये प्रति लिटर झाली होती. या व्यतिरिक्त 293.40 रुपये दराने विक्री होणारे डिझेलचे दर आता 311.84 रुपये झाले होते. या दरवाढीमुळे पाकिस्तानात पहिल्यांदाच इंधनाच्या किंमती 300 रुपयांच्या पुढे गेल्या होत्या. त्यानंतर किंमती कमी होत गेल्या.