पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ: इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा, माजी परराष्ट्रमंत्र्यांनाही शिक्षा
Imran Khan : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना मोठा झटका बसला आहे. त्यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI)चे संस्थापक इम्रान खान यांच्याविरोधात ही कारवाई सायफर प्रकरणात करण्यात आली आहे. स्थानिक वृत्तपत्र ‘डॉन’च्या वृत्तानुसार, इम्रान खान व्यतिरिक्त देशाचे माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही या प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्टनुसार स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने दोन्ही नेत्यांविरोधात हा निर्णय दिला आहे.
पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, त्यापूर्वीच हा निकाल आला आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक आव्हाने असताना इम्रान खान यांचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. विशेष म्हणजे सध्या त्यांच्याकडे निवडणूक चिन्हही नाही. दरम्यान सायफर केस ही राजनयिक दस्तऐवजाशी संबंधित बाब आहे.
इम्रान खान यांनी त्यांना खुर्चीवरून हटवण्याला अमेरिकेचे षडयंत्र असल्याचे म्हटले होते. एका सायफरचा हवाला देत त्यांनी आरोप केला होता की अमेरिकेने त्यांना खुर्चीवरून हटवण्याची धमकी दिली होती. यानंतर गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक केल्याप्रकरणी इम्रान खानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. इम्रान यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात शाह महमूद कुरेशी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री होते. त्यामुळे त्यांनाही 10 वर्षांची शिक्षाही झाली होती.
सुषमा अंधारे महाराष्ट्र पिंजून काढणार! 800 किलोमीटरच्या ‘मातृतीर्थ ते शिवतीर्थ’ यात्रेची सुरुवात
सायफर हा एक राजनयिक दस्तऐवज आहे. इतर देशांत नेमलेले राजदूत ते त्यांच्या देशाला माहिती देण्यासाठी पाठवतात. सायफर परराष्ट्र मंत्रालयाकडून प्राप्त झाला आहे. सायफरमध्ये लिहिलेल्या गोष्टी गुप्त ठेवल्या जातात. ते सार्वजनिक केले जात नाही.
मेळाव्यातून कार्यकर्त्यांना ‘टॉनिक’, निवडणुकीचंही ‘प्लॅनिंग’; घुले पाटलांच्या मनात नक्की काय?
यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांच्या अटकेनंतरचा जामीन मंजूर केला होता. पण गेल्या काही दिवसांपासून इम्रान खान इतर प्रकरणांमध्ये तुरुंगात होते, तर माजी परराष्ट्र मंत्र्यांची सुटकाही रोखण्यात आली होती. कारण त्यांना 9 मे रोजी आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या दोन्ही नेते तुरुंगात आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये या प्रकरणात या दोघांची नावे पहिल्यांदा समोर आली होती. मात्र, तेव्हा दोघांनीही चूक मान्य केली नाही.
बिहारनंतर तावडेंकडून चंदीगडचीही मोहीम फत्ते : बहुमत नसतानाही भाजपने आप-काँग्रेसला पाजले पाणी