मेळाव्यातून कार्यकर्त्यांना ‘टॉनिक’, निवडणुकीचंही ‘प्लॅनिंग’; घुले पाटलांच्या मनात नक्की काय?

मेळाव्यातून कार्यकर्त्यांना ‘टॉनिक’, निवडणुकीचंही ‘प्लॅनिंग’; घुले पाटलांच्या मनात नक्की काय?

Elections 2024 : राज्यात लोकसभा आणि त्या पाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची (Elections 2024) जोरदार तयारी सुरू झाली आहे. नगर जिल्ह्यातही (Ahmednagar News) या निवडणुकांसाठी मैदान तयार होऊ लागले आहे. कुणाचं तिकीट फायनल झालं हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे मात्र इच्छुक नेतेमंडळींनी दावेदारी ठोकण्यास सुरुवात केली आहे. यातच आता शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील (Chandrashekhar Ghule) यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. शेवगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या युवक निर्धार मेळाव्यात त्यांनी विद्यमान आमदार मोनिका राजळे यांचा नामोल्लेख टाळत घणाघाती टीका केली.

आगामी काळात सर्व ताकदीनिशी निवडणुकांना समोरे जायचे आहे. सध्या बूथनिहाय कमिट्यांचे काम सुरू आहे. पाथर्डीतही जायचे आहे. सर्व कार्यक्रम आजच उघड करत नाही. आपला खटका नंतर सुरू करू, अशा त्यांच्या नेहमीच्या अंदाजात सांगत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतण्याचे संकेत दिले.

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातदेखील निवडणुकीची तयारी जोर धरू लागली आहे. माजी आमदार चंद्रशेखर घुले निवडणुका जवळ येऊ लागताच मेळाव्याच्या माध्यमातून सक्रिय झाले आहेत. शेवगाव येथे युवक परिवर्तन मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना येणाऱ्या सज्ज राहण्याच्या सूचना केल्या. शेवगाव शहरातील आखेगाव रस्त्यावरील मंगल कार्यालयात युवक निर्धार परिवर्तन मेळावा आयोजित करण्यात आला होता.

Ahmednagar News : ज्यांना साखर कडू लागते, त्यांनी लाडू वाटावेत, सुजय विखेंचा विरोधकांना टोला

यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना माजी आ.चंद्रशेखर घुले म्हणाले, एकेकाळी जिल्ह्यात आग्रेसर राहिलेला शेवगाव तालुका सध्या सर्वच क्षेत्रात पिछाडीवर गेला आहे. आपल्या आमदारकीच्या काळापर्यंत सर्व क्षेत्रात शेवगाव तालुका हा आग्रेसर राहिला होता मात्र आजच्या परिस्थितीमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने मुलभूत सुविधांसह सर्वच क्षेत्रात तालुक्याची वाताहत झाली आहे.

याबाबत जनतेने विशेषतः युवक वर्गाने जागृत होऊन परिवर्तन करण्यासाठी कटिबद्ध होणे आवश्यक आहे. केवळ राजकारण डोळ्यांसमोर ठेवून विकास कामांचा डांगोरा पिटला जात आहे. त्यामुळे केवळ शेवगाव तालुक्यातच नव्हे तर पाथर्डी तालुक्याच्या जनतेत सुद्धा अस्वस्थता आहे, अशी टीका त्यांनी आमदार राजळे यांच्यावर केली. याचबरोबर चंद्रशेखर घुले पाटील विधानसभेच्या रिंगणात उतरणार याची प्रचिती ‘युवक निर्धार परिवर्तन मेळावा’ मध्ये आली.

राजळेंसमोर घुले-ढाकणेंचे आव्हान

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात सध्या भाजपाच्या मोनिका राजळे आमदार आहे. राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे राजकीय गणित बिघडली आहेत. या मतदारसंघामध्ये आगामी निवडणूक चुरशीची होणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. राजळे यांच्यासमोर राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांच्यासह आता माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे आव्हान उभे आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची लोकप्रतिनिधींकडूनच अडचण केली जात असल्याचा घटना मध्यंतरी समोर आल्या होत्या. यामुळे पक्षातीलच कार्यकर्ते यांच्यासह पदाधिकारी देखील आमदार राजळे यांच्यावर जाहीर नाराज असल्याची चर्चा आहे

Ahmednagar News : आघाडीत बिघाडी! श्रीगोंद्यातील राजकीय गणित बदलणार…

घुले कोणत्या गटात, अद्याप पत्ते झाकलेलेच

दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट व अजित पवार गट तयार झाले. काही दिवसांपूर्वी शरद पवारांचे खंदे समर्थक अन् जयंत पाटील यांचे सख्खे सोयरे असलेले माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. घुले यांनी अजितदादा गटाला पाठिंबा दिला तर नगर जिल्ह्यातील राजकिय समीकरणे बदलू शकतात. दरम्यान अद्याप घुले यांनी याबाबत काही भाष्य केले नाही आहे मात्र येणाऱ्या काळात जस जशा निवडणुका या जवळ येऊ लागतील तस तसे घुले आपले पत्ते उलघडतील असे दिसत आहे.

दरम्यान, शेवगाव येथे झालेल्या या मेळाव्यात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. बूथ कमिट्यांचे नियोजन कसे करायचे याचेही मार्गदर्शन केले. निवडणूक लढण्याबाबत अद्याप निश्चित नाही. पक्ष संघटना ठरवील त्यानुसार होईल, असे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी लेट्सअप मराठीला सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज