‘हा’ दाक्षिणात्य सुपरस्टारची राजकारणात एन्ट्री! लवकरच करणार पक्ष स्थापनेची घोषणा

‘हा’ दाक्षिणात्य सुपरस्टारची राजकारणात एन्ट्री! लवकरच करणार पक्ष स्थापनेची घोषणा

Thalapathy Vijay : अभिनेते रजनीकांत यांच्यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार विजय (Thalapathy Vijay) ज्याला चाहते थालापती विजय म्हणून ओळखतात. तो लवकरच राजकारणामध्ये प्रवेश करणार आहे. लवकरच तो आपल्या नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा देखील करणार आहे. त्याच्या पक्षाचा अध्यक्ष कोण असणार आहे. त्याचबरोबर पक्षाची घटना या सर्व गोष्टींची नोंदणी त्याने निवडणूक आयोगाकडे (Election Commission ) केले आहे.

मेळाव्यातून कार्यकर्त्यांना ‘टॉनिक’, निवडणुकीचंही ‘प्लॅनिंग’; घुले पाटलांच्या मनात नक्की काय?

निवडणूक आयोगाकडे आपल्या पक्षाची नोंदणी करताना जवळपास 200 सदस्यांनी या पक्षाच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावली होती. तर 2026 मध्ये होणाऱ्या तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय हा प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय सहभाग घेईल. मात्र त्या पक्षाचे नाव कोणतं असणार आहे? हे त्याने सांगितलेलं नाही. पण त्याच्या पक्षाच्या नावांमध्ये कळघम हा शब्द इतर दक्षिणात्य राजकीय पक्षांप्रमाणे असण्याची शक्यता वर्तन देत आहे.

बिहारनंतर तावडेंकडून चंदीगडचीही मोहीम फत्ते : बहुमत नसतानाही भाजपने आप-काँग्रेसला पाजले पाणी

दरम्यान विजय गेल्या काही दिवसांपूर्वी त्याच्या ‘लियो’ (Leo) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला होता. हा चित्रपट पार्थीबन नामक हिमाचलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या आयुष्यावर आधारीत आहे. पत्नी, दोन मुलं आणि एक कॅफे असं आरामदायी आयुष्य जगणाऱ्या पार्थीबनची गोष्ट या चित्रपटात आहे. या चित्रपटात विजय थपापती प्रमुख भूमिका साकारली आहे.

सेव्हन स्क्रीन स्टुडिओ निर्मित, लिओला अनिरुद्ध रविचंदरने संगीत दिले होते. सिनेमॅटोग्राफी मनोज परमहंस यांनी केली. तर या चित्रपटाची कथा पटकथा लोकेश, रत्ना कुमार आणि दीरज वैद्य यांनी लिहिलं. या चित्रपटात विजय, त्रिशा, संजय दत्त, अर्जुन सर्जा, मायस्किन, गौतम मेनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात संजयत व्हिलनच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube