Thalapathy Vijay: दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयच्या अडचणीत वाढ; काय आहे नेमकं प्रकरण?

  • Written By: Published:
338967437_107964582249469_990477466333000736_n

Thalapathy Vijay : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजय (Thalapathy Vijay) सध्या ‘लियो’ (Leo) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. ‘लियो’ या सिनेमाची चाहते खूपच प्रतीक्षा करत असल्याचे बघायला मिळत आहे. (Entertainment) अॅडव्हान्स बुकिंगमध्ये देखील या सिनेमाने एक अनोखा विक्रम केला आहे. परंतु आता या सिनेमासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. हैदराबाद न्यायालयाने थलापतीच्या बहुप्रतिक्षित ‘लियो’ सिनेमाच्या प्रदर्शनाला 20 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिल्याची माहिती समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by THALAPATHY VIJAY (@thalapathy__vijay__offical__)


मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील एका न्यायालयाने 20 ऑक्टोपर्यंत अभिनेता विजयच्या बहुचर्चित ‘लियो’ सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. सितारा एंटरटेनमेंटचे नागा वामनी यांनी ‘लियो’ या शीर्षकाचे हक्क आपल्याकडे असल्याचा दावा करत यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सिनेमाचे नाव बदलण्याची मागणी देखील सध्या जोर धरत आहे.

विजय थलापतीचा ‘लियो’ हा सिनेमा चांगलाच सुपरहिट होणार या काही शंका नाही. अर्ली मॉर्निंग शोसाठी निर्माते सध्या प्रयत्न करत आहेत. तामिळनाडू सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ‘लियो’च्या प्रदर्शनासाठी काही अटी ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे आता या सिनेमाचा सकाळचा शो नसणार आहे.

‘लियो’ या सिनेमात चाहत्यांना चांगलाच अॅक्शनचा तडका बघायला मिळणार आहे. या सिनेमामध्ये थलापती विजयसह तृषा कृष्णन, अर्जुन सरजा, गौतम मेनन, मैसस्किन आणि प्रिया आनंद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये मनोरंजन करताना दिसणार आहेत. तसेच बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची देखील एक झलक या सिनेमात बघायला मिळणार आहे. रत्ना कुमार आणि धीरज वैद्य यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे. ‘लियो’ हा सिनेमा 19 ऑक्टोबर दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

होऊ दे धुरळा! दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयचं अनोख रेकॉर्ड; Leo’ने परदेशात रचला इतिहास

विजय स्टरर हा सिनेमा ब्लॉकबस्टर सिनेमा असणार आहे. प्रदर्शनच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने ७० कोटींपेक्षा जास्त गल्ला कमावला आहे. रजनीकांतच्या जेलरला हा सिनेमा टक्कर देणार का याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागलं आहे. तसेच ‘लियो’ हा सिनेमा एकीकडे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. तर दुसरीकडे हा सिनेमा चांगलाच वादात सापडल्याचे बघायला मिळत आहे. ‘लियो’ या सिनेमाने देशात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे दिसत आहे.

Tags

follow us