होऊ दे धुरळा! दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयचं अनोख रेकॉर्ड; Leo’ने परदेशात रचला इतिहास

होऊ दे धुरळा! दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयचं अनोख रेकॉर्ड; Leo’ने परदेशात रचला इतिहास

Thalapathy Vijay Leo Movie : थलपथी विजय (Thalapathy Vijay) साऊथ सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. त्याचे करोडो चाहते आहेत. विजयची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. थलापतीच्या ‘लियो’ (Leo) या सिनेमाची सिनेप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ बघायला मिळत आहे. लवकरच हा सिनेमा चाहत्यांच्या मनावर राज्य करणार आहे. आता या सिनेमाने रिलीजपूर्वीच एक अनोखा इतिहास रचला आहे. थलापती विजयने शाहरुख म्हणजेच चाहत्यांचा लाडका किंग खानचा (Shah Rukh Khan) रेकॉर्ड मोडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by THALAPATHY VIJAY (@thalapathy__vijay__offical__)


थलापती विजयचा ‘लियो’ हा पॅन इंडिया सिनेमा आहे. या सिनेमाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. ‘कैथी’ आणि ‘विक्रम’ या सिनेमांचं दिग्दर्शन केलेल्या लोकेश कनगराज यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. गेल्या काही दिवसापासून देशात या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला जोरदार सुरुवात झाली आहे. तसेच भारतापाठोपाठ परदेशात देखील या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगने अनोखं रेकॉर्ड केले आहे.

यूकेमध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा भारतीय सिनेमा ठरला ‘लियो’ हा सिनेमा 19 ऑक्टोबर 2023 दिवशी चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज राहणार आहे. यूकेमध्ये या सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंगला सध्या मोठा प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाने मोठी कमाई केल्याचे बघायला मिळणार आहे. यामुळे यूकेमध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा भारतीय सिनेमा ‘लियो’ या सिनेमाने अनोख रेकॉर्ड केला आहे.

Mahadev Betting App प्रकरणातील मुख्य सुत्रधार मुंबई पोलिसांच्या हाती

यूकेमध्ये आतापर्यंत बॉलिवूडचा बादशाह किंग खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानच्या सिनेमांनी सर्वाधिक गल्ला कमावला आहे. किंग खानच्या ‘पठाण’ या सिनेमाला सर्वाधिक ओपनिंग मिळालं होतं. ‘पठाण’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 3 कोटी 22 लाख रुपयांचा गल्ला कमावला होता. तर ‘लियो’ने पहिल्या दिवशी आतापर्यंत 3 कोटी 23 लाखांची सर्वात मोठी कमाई केली आहे. यूएसएमध्ये लियो हा सिनेमा 2D ते एक्सडी ते आयमॅक्स आणि आरपीएक्स पर्यंतच्या फॉरमॅटमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘लियो’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका करणार आहे. लियो या सिनेमात विजय आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube