Download App

Pakistan Bomb Attack: पाकिस्तानध्ये लष्करी ताफा टार्गेट, आत्मघातकी बॉम्बस्फोटात 13 सैनिक ठार

पाकिस्तानध्ये एक भीषण हल्ला झाला आहे. लष्करी ताफ्याला लक्ष्य करून केलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात १३ सैनिक ठार झाल्याचे वृत्त समोर आलं आहे

  • Written By: Last Updated:

Pakistan Bomb Attack: पाकिस्तान दिवसेंदिवस बॉम्बस्फोट हल्ल्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पाकिस्तानध्ये (Pakistan) एक भीषण हल्ला झाला आहे. लष्करी ताफ्याला लक्ष्य करून केलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात (Suicide bombing) १३ सैनिक ठार झाल्याचे वृत्त समोर आलं आहे. तर १० सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात हा स्फोट झाल्याचं सांगितले जात आहे.

तीन हजार विद्यार्थ्यांसोबत शिवस्तुती! ‘कमळी’ ची वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाला गवसणी 

खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तानच्या वायव्य जिल्ह्यातून लष्करी काफिला जात असताना हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आला. एका स्थानिक सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, आत्मघातकी हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेले वाहन लष्करी ताफ्यावर धडकवले. त्यानंतर झालेल्या स्फोटात १३ सैनिक ठार झाले. तर १० सैनिक आणि १९ नागरिकही गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटात जवळपासच्या घरांचेही नुकसान झाले. स्फोटामुळे दोन घरांचे छप्परही कोसळले असून त्यात सहा मुले जखमी झाली. हल्ला झालेले ठिकाण पाकिस्तानमधील सर्वात तणावपूर्ण भाग आहे. येथे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चे हल्ले अनेकदा झाले आहेत. दरम्यान, आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.मात्र, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) किंवा त्याच्याशी संबंधित एखाद्या गटाचा या हल्ल्यामागे हात असू शकतो.

दरम्यान, लष्कर आणि सुरक्षा संस्था परिसरात शोध मोहीम राबवत आहेत. तर जखमींना जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सोमवारी बीड बंदची हाक; क्लासेसच्या गेटला फासले काळे, आरोपींना अट करा, पालक आक्रमक 

पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ले
अलिकडच्या काळात पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. विशेषतः खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले झपाट्याने वाढले आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये एका हल्ल्यात १६ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आणि ८ जण जखमी झाले. हा हल्ला अफगाणिस्तान सीमेजवळ झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी टीटीपीने घेतली होती. तर जानेवारीमध्ये,बलुच लिबरेशन आर्मीने केचमध्ये ३५ हल्ले केले होते. त्यात ९४ सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता.

जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर
२०२५ च्या जागतिक दहशतवाद निर्देशांकाच्या ताज्या अहवालानुसार, २०२४ मध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंताजनकपणे वाढली आहे. २०२३ मध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये ७४८ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०२४ मध्ये ही संख्या १,०८१ वर पोहोचली आहे. या वाढीमुळे पाकिस्तान आता जगातील दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

follow us